मुंबई

Coronaeffect : कोरोना रोखण्याची जबाबदारी “या” आठ सनदी अधिका-यांवर

टीम लय भारी

मुंबई : लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी संपत आला तरी मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची (Corona Virus) संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आता आठ सनदी अधिका-यांची फौज नियुक्त केली आहे.

या अधिका-यांकडे सात परिमंडळाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता संबंधित अधिका-यांवर जबाबदा-याही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये रुग्णालयांचे नियंत्रण, उपचार, बाधित रुग्णांना शोधणे, लॉकडाऊन शिथिल झाल्यास उपाययोजना, पालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणा-या सर्व सेवा-सुविधांचा नियमित आढावा अशा सर्वांचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करावा लागणार आहे. त्यानंतर परिमंडळ व्यतिरिक्त या अधिका-यांवर आणखी काही जबाबदा-या सोपवण्यात आल्या आहेत. या पथकात असलेल्या पालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोना रोखण्याचे काम करावे लागणार असल्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी काढलेल्या परिपत्रकातून दिले आहेत.

अधिकारी आणि त्यांची जबाबदारी

प्राजक्ता लवंगारे-वर्मा : कोविड योद्धा नेमणे, स्वयंसेवक, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय असे आरोग्य कर्मचारी नेमण्याची जबाबदारी.

आशुतोष सलिल : कोविड केअर सेंटर-२ आणि कोविड केअर सेंटर-३ची मोठ्या प्रमाणात निर्मिती, पालिकेला सहकार्य करणा-या म्हाडा, सिडकोशी समन्वय साधणे, ऑक्सिजन-आयसीयू व्यवस्था पाहणे, मनुष्यबळाचे व्यवस्थापन.

मनीषा म्हैसकर : रुग्णालयांतील खाटांची व्यवस्था पाहणे, सर्व पालिका रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांकडून नियमित आढावा घेणे, समन्वयासाठी गट तयार करून काम करणे. सर्व अधिष्ठाता म्हैसकर यांना अहवाल सादर करणार आहेत.

अश्विनी भिडे : पालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रूमची जबाबदारी आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे, क्वारंटाईन, कोविड-१९ सेंटर आणि प्रतिबंधित क्षेत्रांचे व्यवस्थापनासंबंधातील बाबींवर नियंत्रण ठेवणे.

संजीव जयस्वाल : स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याबाबत राज्य सरकारशी समन्वय, त्यांचे प्रश्न, राज्य शासनाच्या निदेर्शानुसार अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणार आहे.

सुरेश काकाणी : मोठी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचे व्यवस्थापन, डिस्चार्ज प्रोटोकॉल आणि आरोग्य विभागाचे प्रशासन.

पी. वेलारसू : पावसाळापूर्व नालेसफाई, रस्ते, पूल बांधणी अशा कामांसह राष्ट्रीय प्रवाशांचे स्क्रिनिंग, क्वारंटाईन आणि वैद्यकीय साधनांची खरेदी आणि पुरवठा या कामांवर नियंत्रण.

डॉ. एन. रामास्वामी : सेव्हन हिल्स रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविणे, वैद्यकीय कर्मचा-यांची नियुक्ती करणे, आरोग्य कर्मचा-यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या कामावर नियंत्रण ठेवणे.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago