मुंबई

रूग्णांना ऑक्सीजन उपलब्ध करण्यासाठी तरूणाने विकली २२ लाखाची गाडी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णाचा जीव जातो आहे, मुंबईच्या मालाडमध्ये राहणारे शाहनवाज शेख हे लोकांसाठी देवदूत बनले आहेत. ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले शेख एका फोन कॉलद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी ‘वॉर रूम’ देखील तयार केले आहे.

लोकांच्या मदतीसाठी शाहनवाजने काही दिवसांपूर्वी २२ लाख रुपयांची एसयूव्ही देखील विकली. फोर्ड एन्डिएवरच्या विक्रीनंतर मिळालेल्या पैशातून शाहनवाजने गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी १६० ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले. शाहनवाज म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही लोकांना मदत करताना पैसे संपले होते, त्यानंतर मी माझी कार विकायचा निर्णय घेतला.

या कारणामुळे लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली

शाहनवाज म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोना संक्रमणच्या कालावधीच्या सुरूवातीलाच त्याच्या एका मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजनच्या अभावी रिक्षामध्ये जीव सोडला. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, मुंबईतील रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करायचे. लोकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी शाहनवाजने एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला आणि ‘वॉर रूम’ देखील स्थापित केली.

पहिले ५० आणि आता ५०० ते ६०० कॉल येतात

शहनवाज सांगतात की, या वेळीची परिस्थिती पहिलेसारखी नाही. जानेवारी महिन्यात  ऑक्सिजनसाठी ५० कॉल येत होते, आता दररोज ५०० ते ६०० कॉल येत आहेत. आता आम्ही फक्त १० ते २० टक्के लोकांना मदत करू शकत आहोत.

अशा लोकांच्या घरी सिलिंडर पोहोचतात

शाहनवाज म्हणाले की, त्याच्याकडे सध्या २०० ऑक्सिजन ड्युरा सिलिंडर आहेत. त्यापैकी ४० भाड्याने घेतले आहेत. फोन करणाऱ्या गरजू व्यक्तीना ते पहिले त्यांच्याकडे बोलवून ऑक्सिजन घेऊन जाण्यास सांगतात आणि ज्यांना येण्यास शक्य नाही अशा लोकांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना ऑक्सिजन सिलिंडर पोहचवला जातो.

४००० पेक्षा जास्त लोकांना मदत केली

टीम मधील लोक रुग्णांना यांचा कसा वापर करायचा ते देखील समजून सांगितले जाते. वापरानंतर, बहुतेक रूग्णांचे नातेवाईक त्यांच्या वॉर रूममध्ये रिक्त सिलेंडर्स वितरीत करतात. शाहनवाज यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरापासून ते ४००० हून अधिक लोकांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडरची मदत पोहचवली आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

6 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

6 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

6 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago