मुंबई

Mumbai Local : लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्तावच नाही

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा मोठा खुलासा

टीम लय भारी

मुंबई : पुन्हा एकदा मुंबई लोकल (Mumbai Local) कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे. एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणताही मागणी प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई लोकल १५ तारखेपर्यंत सुरू करू असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करून महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न त्यांना विचारला असता, मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत राज्यसरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असे रेल्वे मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे.

याचप्रमाणे, ‘सर्वात पहिली किसान स्पेशल ट्रेन आम्ही सुरू केली, ती देखील महाराष्ट्रतील देवळाली इथून, सुरुवातीला तिला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही. मात्र त्यानंतर सर्व ट्रेन भरभरून जात आहेत. शेतक-यांचा माल हा थेट रेल्वे घेऊन जाईल, आता नितीन गडकरी यांनी मागणी केली आहे. नागपूरला आता संत्र्याचा मोसम सुरू होईल, त्यामुळे तिथून किसान रेल चालवा, आम्ही त्याची प्लॅनिंग आता करतो आहोत’, असे गोयल म्हणाले.

अभिषेक सावंत

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

8 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

8 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

10 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

13 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

13 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

16 hours ago