मुंबई

भाजप नेत्याला धमकीचे फोन:धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी; किरीट सोमय्या यांचा दावा

टीम लय भारी

मुंबई : धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे रविवारपासून आतापर्यंत 6 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यातील एकाने गोळी घालण्याची धमकी दिल्याचे ते म्हणाले. सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. सोमय्या यांनी धमकीचे आलेले फोन नंबरही सार्वजनिक केले आहे. किरीय सोमय्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर आरोपींचे फोटो शेअर केले आहेत.

सोमय्या म्हणाले की, रविवारी साडेअकरा वाजता त्यांना दोन धमकीचे फोन आले. फोन करणाऱ्याने माझ्या डोक्यात 6 गोळा घालण्याची धमकी दिली आहे. गेल्या दोन दिवसांत असे सहा धमकी देणारे कॉल त्यांच्याकडे आले. फोन करणारे त्यांना शिवीगाळ करीत असून जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या यांच्यानुसार, धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरून जेव्हा ते बोलू लागले तेव्हापासून ते धमकीचे फोन येत आहेत. सोमय्या यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे पत्नी, मुले व मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार केली होती.

अभिषेक सावंत

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago