मुंबई

जागतिक पातळीवरुन लस खरेदी करणार, BMC चा पुढाकार; आदित्य ठाकरे मैदानात

टीम लय भारी

मुंबई :-  मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण (Vaccination) मोहिमेत अडथळा निर्माण होतो आहे. मुंबईत लसींची (Vaccine) पुरेशी उपलब्ध करण्यासाठी लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत, ही माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली (Mumbai Municipal Corporation has been instructed to look into the possibility of global procurement, said Aditya Thackeray).

शहरातील लसीकरण (Vaccination) वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले.

अपेक्षा आहे विरोधी पक्षनेते गडकरींचा सल्ला मानतील : रोहित पवार

विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेतल्यानंतर चाहत्यांसाठी स्पेशल मॅसेज

State governments can purchase only 25% of vaccines – belying Centre’s claim of equitable policy

सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी (Vaccine) स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस (Vaccine) सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत, असे ही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

‘लसीकरण केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरु’

 मुंबईची लसींची (Vaccine) अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण (Vaccination) केंद्र वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण (Vaccination) केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण (Vaccination) केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण (Vaccination) केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस (Vaccine) सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असे ही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

‘अन्य शहरांनीही ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी’

गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचना ही आज महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहिती ही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली. राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण (Vaccination) होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण (Vaccination) मोहीम घ्यावी, असे आवाहनही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) केले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

28 mins ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

21 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

21 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

22 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

23 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

1 day ago