राष्ट्रीय

आणि पाकिस्तानी कवियत्री रेहाना रुही यांची गझल लोकसभेत गाजली

केंद्र सरकारने संसद आणि विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठीचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले. लोकसभेतील महिला आरक्षणासाठी करायच्या घटनादुरुस्तीवरील चर्चेत तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या भाषणाची अखेर कराची येथील कवियत्री रेहाना रुही यांच्या गझलेतील-
दिल के बहलाने का सामान न समझा जाय
हम को अब इतना भी आसान न समझा जाय ll

या ओळींनी केली. तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या खासदार आहेत. एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ख्याती आहे. मोइत्रा या २०१६ ते २०१९ पर्यंत करीमपुर विधानसभा मतदार संघाच्या प्रतिनिधित्व करत होत्या. काही वर्षापासून त्या अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसच्या महासचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही कार्यरत आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणाविरोधात विरोधकांमधील जे खासदार आवाज उठवतात त्यात मोईत्रा एक आहेत. लोकसभेत भाषण करताना त्या विविध शायर मंडळींच्या कविता सादर करत असतात. असेच बुधवार त्यांनी कवियत्री रेहाना रुही यांच्या गझलेने केली. त्यांनी सादर केलेली सगळी कविता आम्ही आमच्या ‘लय भारी’च्या वाचकांसाठी देत आहोत.

दिल के बहलाने का सामान न समझा जाए

मुझ को अब इतना भी आसान न समझा जाए

मैं भी दुनिया की तरह जीने का हक़ माँगती हूँ

इस को ग़द्दारी का एलान न समझा जाए

अब तो बेटे भी चले जाते हैं हो कर रुख़्सत

सिर्फ़ बेटी को ही मेहमान न समझा जाए

मेरी पहचान को काफ़ी है अगर मेरी शनाख़्त

मुझ को फिर क्यूँ मिरी पहचान न समझा जाए

मैं ने ये कब कहा ‘रूही’ कि मिरे जीवन में

मेरे साईं को मिरी जान न समझा जाए

– रेहाना रूही

भारताची फाळणी झाल्यावर मुहम्मद इक़बाल, फ़ैज़ अहमद फ़ैज़, सदाअत मंटो आदी साहित्यिक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. पण त्यांच्या साहित्याचे दिवाणे अजूनही भारतात आहेत. पाकिस्तानच्या कराचीमध्ये जन्म झालेल्या रेहाना रूही यांनी अर्थशास्त्र आणि उर्दूमधून सिंध विद्यापीठातून एमए केले आहे. त्या सध्या सौदी आरबिया मध्ये अनेक वर्ष राहत  होत्या. आता कराचीत सेटल झाल्या आहेत. रेहाना रूही यांचा ‘इशकजाद’ (Eshqzad) हा पहिला काव्यसंग्रह २००० मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर  तुम मेरी कमजोरी हो, मे तनहा बहुत, दोस्त बनने से पहले सोचा था असे तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्या भारत, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील अनेक मुशहऱ्यातमध्ये सहभागी असतात.

विवेक कांबळे

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

3 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

4 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

5 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

9 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

9 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

11 hours ago