राष्ट्रीय

समान नागरी कायद्यावर काय म्हणाले शरद पवार ?

केंद्र सरकार आता समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय विधी आयोगाने समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नागरिकांकडून सुचना मागविल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे केंद्र सरकार या कायद्याबाबत लवकरच ठोस भूमिका घेईल अशी शक्यता दिसत आहे, दरम्यान समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

वर्षभरात देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकार हा कायदा आणण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. या कायद्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, समान नागरी कायद्याचा प्रस्ताव अजून तरी संसदीय समितीसमोर किंवा संसदेसमोर आलेला नाही. जेव्हा हा प्रस्ताव येईल त्यावेळी यावर चर्चा करता येईल. मात्र हा जो कायदा येणार आहे त्यात एखादा समाज, जात यांना टार्गेट करायचा प्रयत्न आहे का ? हे पहावे लागेल. जोपर्यंत आमच्या समोर कायद्याचा मसूदा येत नाही तोपर्यंत त्यावर बोलता येणार नसल्याचे देखील पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल, चाहत्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पालिकेने दिला पाणी कपातीचा इशारा

गुजरातला तडाखा दिल्यानंतर, बिपरजॉय चक्रीवादळाचे राजस्थानकडे कूच

देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चर्चेत येण्याची त्यावरुन राजकारण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. अनेक विरोधीपक्षांचा समान नागरी कायद्याला विरोध आहे. त्यामुळे जर समान नागरी कायद्याचा मसूदा संसदेसमोर आला तर या कायद्याला विरोधकांचा कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

37 mins ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

2 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

3 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

3 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

4 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

4 hours ago