क्रीडा

Australia Cricket : ऑस्ट्रेलियाला कॅप्टन मिळेना! मार्शने कर्णधारपद नाकारल्याची माहिती उघड

अष्टपैलू मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन संघाचा वनडे कर्णधार होण्यास उत्सुक नाही. त्याने स्वतःला या शर्यतीतून बाहेर घोषित केले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा नवा एकदिवसीय कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा सर्वात मोठा दावेदार आहे. कदाचित टी20 विश्वचषक 2022 नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा करेल. मात्र सध्यातरी ऑस्ट्रेलियाचा संघ नवा कर्मधार शओधत ाहे. ज्यासाठी त्यांच्याकडे पर्यायांचा तुटवडा असल्याचे दिसून येत आहे.

एरॉन फिंच मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या (ODI आणि T20) दोन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. गेल्या महिन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाकडे सध्या एकही वनडे कर्णधार नाही. मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फिंच ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत राहील. तसे म्हटले जात आहे की आगामी विश्वचषकानंतर फिंच टी-20 क्रिकेटलाही अलविदा म्हणू शकतो. असे झाल्यास पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या या दोन्ही फॉरमॅटसाठी ऑस्ट्रेलियाला नवे कर्णधार शोधावे लागतील.

हे सुद्धा वाचा

Amitabh Bachchan Birthday : ‘बीग बीं’च्या मनाचा मोठेपणा! चाहत्यांसोबत साजरा केला 80वा वाढदिवस

Eknath Shinde : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिन्ह ठरलं!

INDvsSA ODI : शेवटच्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता? वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

या विषयावर बोलत असताना मिचेल मार्श म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मी या शर्यतीतून बाहेर पडलो आहे. सध्या तरी या विश्वचषकासाठी मला माझे शरीर तंदुरुस्त ठेवावे लागेल. ऑस्ट्रेलियाच्या वनडे कर्णधाराचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला घ्यायचा असून तो या विश्वचषकानंतर निर्णय घेईल. याबद्दल मी कधीच काही विचार केला नाही.

डेव्हिड वॉर्नरचे नाव आघाडीवर आहे
अॅरॉन फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून ऑस्ट्रेलियन संघाचा पुढील वनडे कर्णधार कोण असेल याची चर्चा सुरू आहे. या शर्यतीत डेव्हिड वॉर्नर आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बॉल टॅम्परिंगच्या घटनेनंतर त्याच्यावर कर्णधारपदावरून आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण वॉर्नरला दुसरी संधी नक्कीच मिळाली पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सातत्याने सांगत आहेत. अॅरॉन फिंचनेही वॉर्नरचे नाव पुढे केले आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

16 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

18 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

18 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

19 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

19 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

20 hours ago