क्रीडा

IND vs BAN T20 मालिका या तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर, 6 ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. एकीकडे सर्वांचे लक्ष 27 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या कसोटी सामान्यकडे आहे. तर दुसरीकडे निवड समिती टी-20 मालिकेसाठी संघ कधी जाहीर करणार आणि कोणते खेळाडू असतील याकडेही लक्ष लागले आहे.(India vs Bangladesh T20 Series 2024 Schedule)

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

बांगलादेशनेही अद्याप टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केलेला नाही. बांगलादेशचा संघ गेल्या काही वर्षांत टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया या मालिकेत त्याला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. (India vs Bangladesh T20 Series 2024 Schedule)

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबर रोजी देशाची राजधानी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळले जातील, तर टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल. (India vs Bangladesh T20 Series 2024 Schedule)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील शेवटचा T20 सामना या वर्षी जूनमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. हा सामना टीम इंडियाने 50 धावांनी जिंकला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहूया भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 14 टी-20 सामने खेळले गेले आहे. यातील 13 सामने भारतने जिंकले आहेत. तर 1 सामना बांगलादेश जिंकू शकला आहे. (India vs Bangladesh T20 Series 2024 Schedule)

भारत आणि बांग्लादेश यांच्यात 2019-20 मध्ये टी-20 मालिका खेळली गेली, ज्यामध्ये बांगलादेश संघाने दिल्लीमध्ये खेळलेला पहिला सामना 7 विकेटने जिंकण्यात यश मिळविले होते, जे या फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धचा आतापर्यंतचा एकमेव विजय आहे. (India vs Bangladesh T20 Series 2024 Schedule)

काजल चोपडे

Recent Posts

आलिया-रणबीरच्या लाडलीने पुन्हा आपल्या क्यूटनेसने जिंकली सर्वांची मने, पहा व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहाच्या चेहऱ्यावरचे हाव भाव पाहून…

50 mins ago

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सीझन 2: ‘देवरा’ चित्रपटाची स्टारकास्ट होणार सहभागी

नेटफ्लिक्सवर कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा दुसरा सीझन सुरू झाला आहे. सीझन…

2 hours ago

कार्तिक आर्यनने केले ‘भूल भुलैया-3’ चे नवीन पोस्टर शेअर

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या येणाऱ्या चित्रपट 'भूल भुलैया-3' ला घेऊन चर्चेत आहे. आता या…

2 hours ago

चेहऱ्याचे हरवलेले सौंदर्य परत हवे आहे? मग हे स्किन केअर टिप्स खास तुमच्यासाठी

आजकाल सर्वांची जीवनशैली खूप जास्त धावपळीची झाली आहे. यामुळे स्त्री असो की पुरुष कोणालाच आपल्या…

3 hours ago

आता घरबसल्या मेकअप ब्रश स्वच्छ करा, या सोप्या पद्धतींनी

स्त्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी मेकअप किट नक्कीच वापरतात. मेकअप किटमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ब्रश बजावतो.…

4 hours ago

Shambhuraj Desai | Satyajit Pathankar आमचे आमदार | Vidhansabha 2024

लय भारी चे संपादक तुषार खरात हे पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागात नुकताच दौरा केला(Satyajit…

4 hours ago