राजकीय

भाजपाच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

टीम लय भारी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर गेले आहे. उत्तर प्रदेशात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात वातावरण थोडे कचाकले आहे.(Aditya Thackeray targets central government in BJP’s stronghold)

कारण उत्तर प्रदेशात आता शिवसेनाही लढाईत उतरली आहे. डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत हे उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत.

उत्तर प्रदेशात दौऱ्यावर असताना तिथल्या एका प्रचारसभेत आदित्य ठाकरेंनी आक्रमक होऊन, करोनाच्या पहिल्या लाटेतली एक आठवण व या लाटेदरम्यान मजुरांच्या आपापल्या राज्यात परतण्याच्या तिकीटाचे पैसेही मुख्यमंत्री रिलीफ फंडातून दिल्याचं त्यांनी म्हंटले आहे.

कित्तेक मजुरांना आपल्या गावी, आपल्या आईवडिलांकडे, कुटुंबाकडे जायचे होते, त्यासाठी स्थानकावर गर्दी देखील झाली होती, मात्र केंद्रं सरकारने हवी तशी मदत केली नाही असा जोरदार टोला केंद्र सरकारवर लगावला आहे. इतके फोन करूनही, भारत सरकारने १ मे पर्यंत रेल्वे बंद ठेवल्या. हे किती लाजीरवाणं आहे?

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांची संकल्पना, शिवाजी पार्कमध्ये भरणार भव्य ऐतिहासिक प्रदर्शन!

आदित्य ठाकरेंचा राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

हिजाबच्या वादावर आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

Aditya Thackeray launches special cell dedicated to accelerate Electric Vehicles in Mumbai

हे सर्व सुरू असताना उद्धव ठाकरेंनी सर्वांना आवाहन केलं, आम्ही काळजी घेतो असं सांगून त्यांना परत न जाण्याचं आवाहन केलं. जेवण, राहणं, आरोग्यसुविधा या सगळ्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. मात्र केंद्र सरकारने यात काडीमात्र मदत केली नाही. असे आपल्या शिवसेना पक्षाची बाजू मांडत स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून हे मतदान सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे व ७ मार्च रोजी अखेरच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे.

 

Pratikesh Patil

Recent Posts

फायरिंग करणारा डिंगम गजाआड; दीड किलोमीटर केला पाठलाग

विनयभंग, गंभीर दुखापत व खुनाचा गुन्हा व खुनाचे तीन प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असूनही वारंवार…

2 hours ago

सायबर चोरट्यांनी स्टॉक मार्केटच्या नावाखाली तिघांना फसविले

एका शेअरवर अनेक बोनस मिळतील, आमच्या कंपनीचे स्टॉक (stock market) आयपीओ घेतले तर निव्वळ नफाच…

3 hours ago

मनाई आदेश तरी नदीपात्रात बांधकाम

गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पूलाखाली स्मार्टसिटी कंपनीकडून मॅकेनिकल गेट बसविताना काँक्रिटीकरणाचा बेस तयार केला जात…

3 hours ago

संजय राऊत ज्या शाळेत शिकले, ती शाळा…., नाना पटोलेंचा खोचक टोला

देशात लोकसभा निवडणूक पार पडली असून ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र,…

4 hours ago

मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा एका कैद्याचा खून (killed) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटातील मारहाणीत…

5 hours ago

विंचूरला भरदिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटले; सहा लाख रुपये लंपास

येथील प्रभू श्रीराम चौकात (तीनपाटी) कांदा व्यापाराच्या हातातून सहा लाख रुपये रोकड असलेली पिशवी घेऊन…

12 hours ago