Categories: राजकीय

आदित्य ठाकरेंनी गुपित केले उघड; म्हणाले, माझी उमेदवारी बाबर यांच्यामुळे

लय भारी न्यूज नेटवर्क

विटा : मी निवडणूक लढवावी अशी पहिली इच्छा विटयातून आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण या ठिकाणी आमदार बाबर यांच्यासाठी नाही तर स्वत:च्या प्रचारासाठी आलो आहोत. आमदार अनिल बाबर यांना मत म्हणजेच मला मत.  आजची सभा ही प्रचाराची सभा नसून आमदार बाबर यांची विजयी सभा आहे. निवडणुकीनंतर तीन महिन्यात टेंभू योजनेतून वंचित गावांना पाणी देणार आहे. मुख्यमंत्री अथवा आमदार अशी पदे मिळविण्यापेक्षा मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विटा येथे केले.

विटा येथे महायुतीचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील, आटपाडीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र देशमुख, जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, माजी जि.प. सदस्य सुहासनाना शिंदे, भाजपा नेते सुहास पाटील, माजी नगरसेवक अनिल म. बाबर, आण्णासाहेब पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदित्य  ठाकरे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्र रसातळाला गेला आहे. गेली पाच वर्षे आमची सत्ता यांनी केलेला चुकीचा कारभार निस्तरण्यात गेली आहे. आता आपणाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मागील खेपेस मी आमदार बाबर यांच्या प्रचारासाठी आलो होतो. त्यावेळी त्यांनी निवडणूकीत उभे रहा अशी इच्छा व्यक्त केली होती. वय बसत नसल्याने मी त्यावेळी उभा राहू शकलो नाही. पण यावेळी उभा रहाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कसल्याही परस्थितीत विटयात येवून आशिर्वाद घ्यायचा असा मी निश्‍चिय केला होता, असे आदित्य म्हणाले.

तुषार खरात

Recent Posts

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

12 mins ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

31 mins ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

35 mins ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

3 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

3 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

3 hours ago