राजकीय

निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात : जयंत पाटील

टीम लय भारी

मुंबई :-  पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या गुलालाची उधळण होताच पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दराच्या झळा सर्वसामान्यांना बसू लागल्या आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून देशात दररोज इंधनांची दरवाढ होत असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलचे (Petrol) दर शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर वाढतात असा सवाल जयंत पाटील यांनी क्रेंदीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केला आहे (Jayant Patil has asked Finance Minister Nirmala Sitharaman that petrol-diesel prices will go up after the elections).

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करू लागले आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाच लक्ष्य केले आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या दरावर भूमिका मांडत ‘हे काय वित्त नियोजन आहे का?’, असा सवाल पाटील यांनी सीतारामन यांना केला आहे(Patil has asked Sitharaman, “Is this financial planning?”, Citing the role of rising petrol and diesel prices).

सामना वाचत नसल्याच्या नाना पटोलेंच्या टीकेला संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाउन बाबत निर्णय घेतला जाणार

देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात वाढ होत आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढ होत आहे. परभणीत देशातील सर्वात महागड्या दराने म्हणजे पेट्रोल प्रतिलिटर १००.७५ पैसे तसेच डिझेल ही प्रतिलिटर ९०.६८ रुपये दराने विक्री होत आहे. तर मुंबईतही पेट्रोलचे (Petrol)  दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे (Diesel)  दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. या वाढत्या दरावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल केला आहे (NCP state president Jayant Patil has directly questioned Union Finance Minister Nirmala Sitharaman).

Petrol, diesel prices rise by 25 paise per litre in Delhi to hit fresh all-time highs

“निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की, दरवाढ ही ठरलेलीच; हे काय वित्त नियोजन आहे का? केंद्रीय अर्थमंत्रालय वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा,” असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे (Union Finance Minister Nirmala Sitharaman should shed light, ”said Jayant Patil).

मुंबई-पुण्यात इंधनाच्या दरात उसळी

लॉकडाऊनच्या संकटामुळे सामान्य लोकांना आर्थिक चणचण जाणवत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा काही पैशांची वाढ नोंदवण्यात आली. आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 89.75 इतका आहे.

पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचे आजचे दर

मुंबई :-  पेट्रोल – ९८.३६ , डिझेल – ८९.७५

पुणे :-  पेट्रोल – ९८.०६,  डिझेल – ८८.०८

नागपूर :-  पेट्रोल – ९७.७५,  डिझेल – ८७.९८

नवी मुंबई :-  पेट्रोल – ९८.५६,  डिझेल – ८९.९४

नाशिक :-  पेट्रोल – ९८.७६,  डिझेल – ८८.७६

औरंगाबाद :-  पेट्रोल- ९९.६०,  डिझेल – ९०.९९

जळगावात अफवेमुळे एका दिवसात पेट्रोल पंप रिकामा

जळगावच्या मुक्ताईनगर परिसरात मंगळवारी एका अफवेमुळे लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. पुढील दहा दिवस पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) मिळणार नाही, अशी अफवा या भागात पसरली होती. त्यामुळे कुऱ्हाड येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यापैकी एका पेट्रोल पंपातील इंधनाचा साठा पूर्णपणे संपला.

याविषयी, पेट्रोल पंपाच्या चालकाला विचारले असता त्याने ही अफवा फेटाळून लावली. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) नियमित मिळणार आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले. परंतु, तरीही लोकांनी लांबच लांब रांगा लावून पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) विकत घेतले.

Rasika Jadhav

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

9 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

11 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

12 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago