राजकीय

वय 82 झालं, कधी थांबणार आहात की नाही? अजित पवार यांचा शरद पवारांना सवाल

शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं… तरूणांना संधी कधी देणार? तुम्ही आशीर्वाद द्या ना, मार्गदर्शन करा, चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा… मार्गदर्शन करा, असं अजित पवार म्हणाले. तसेच, शरद पवारांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आणि नंतर मागे घेतला, तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली, ते हट्टी आहेत, ऐकणार नाहीत, असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या शपथविधीनंतर आज एमएनटी येथील बैठकीत बोलताना शरद पवारांवर थेट टिकास्त्र डागलं. 2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणविसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं, जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं, तर का तिथे आम्हाला पाठवलं? असा सवाल अजित पवारांनी थेट शरद पवारांना विचारला आहे.

महाविकास आघाडीच्या काळातही भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं, असं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं होतं, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेलांनी केला होता. त्यावर बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, “मी उपमुख्यमंत्री असताना, माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एक पत्र ड्राफ्ट केलं. हसन मुश्रीफ साहेबांनी 53 विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावं, अशी विनंती सर्व आमदारांनी केली होती. 2017 वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणालं आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की, बाहेर काहीच बोलायचं नाही.”, असं म्हणत अजित पवारांनी गौप्यस्फोट केला.

हे सुद्धा वाचा 
अजित पवारांना व्हायचेय मुख्यमंत्री; कावळा बसायची आणि फांदी तुटायची वाट भाजपा पाहतेय

प्रतिभाताई पवार आत्मचरित्र लिहितील का ?

रिषभ पंतनंतर या भारतीय माजी वेगवान गोलंदाजाचा अपघात, मुलगाही जखमी

आम्हीही पक्ष बांधला…आम्हालाही लोक ऐकतात..आम्हीही नेते आहोत… जर आंबेगावात पवार साहेबांनी सभा घेतली तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल, असे प्रतिआव्हान अजित पवार यांनी शरद पवार यांना देतानाच, एका आमदाराला त्यांनी म्हटलं मला आमदार व्हायचं नाही तर ते म्हणाले की पाहतोच तू जिंकून कसा येतो…असं आपल्या कार्यकर्त्याला बोलतात का…परिवार आहे तो आपला. आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुठल्याही परिवारावर येऊ नये..माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही. पवारांनी स्वतः आम्हाला सांगितलं की 2024 साली नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही..आपण विधानसभेच्या 90 जागा लढवणार..लोकसभेच्याही जास्त जागा लढवणार आहोत. असेही अजित पवार यांनी सांगितले.

विवेक कांबळे

Recent Posts

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

18 mins ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

37 mins ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

41 mins ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

3 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

3 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

3 hours ago