राजकीय

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताच भ्रष्टाचार नाहीय! अजित पवारांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

टीम लय भारी

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. किरीट सोमय्या यांच असं म्हणणं आहे की या कोव्हिड सेंटर मध्ये अंतर्गत भ्रष्टाचार सुरू आहे)(Ajit Pawar’s reply, no corruption in Pune’s Jumbo Covid Center!).

आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असे त्यांना उत्तर दिले आहे. किंबहूना या सेंटरच्या कामातही कोणताच कोणाचाही राजकीय सहभाग नव्हता हे त्यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत , पहिला विषय हा त्यांचा जम्बो कोविड सेंटरचा निघाला. त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार या सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झालं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.

15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाला अडचण का येण्याचं कारण असं की, या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिनचे डोस देण्याचा निर्णय घेतला गेला होता. आणि भारत बायोटेक कोव्हॅक्सिन तयार करते. पण त्यांच्याकडून तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या लस कमी आहेत. त्यामुळे शाळा सुरू असताना लसीकरणाचा कार्यक्रम घेता येत न्हवता. मुंबईत गेल्यावर वरिष्ठ पातळीवर बोलून पुणे आणि महाराष्ट्राला कोव्हॅक्सिनचा साठा देण्याची मागणी आम्ही करूच. ग्रामीणला चांगलं व्हॅक्सिनेशन झालं आहे. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडला कमी झालं आहे, असं सांगतानाच पण पुण्यात कोरोना रुग्ण स्थिती अटोक्यात आहे. असंही त्यांनी या परिषदेत स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

शिक्षकांनी शनिवार-रविवारी जादा तास घ्यावेत : अजित पवार

वाईन आणि दारू यात फरक असतो; अजित पवारांचा भाजपवर निशाणा

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

Mumbai: Ajit Pawar praises Aaditya Thackeray’s development vision after visiting slew of projects in Worli and adjoining areas

Team Lay Bhari

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

3 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

16 hours ago