Categories: राजकीय

Atmanirbhar Bharat : 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये मागासवर्गीयांना भोपळा : आमदार गजभिये

टीम लय भारी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ( Atmanirbhar Bharat ) मोहिमेअंतर्गत २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण यांत मागासवर्गीयांसाठी काहीही जाहीर केले नसल्याचा आरोप आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे.

गरीब मागासवर्गीयांनी थाळी वाजवूनही मोदी यांनी ती रिकामी ठेवली आहे. भाजप सरकारने अगोदरच मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याची कारस्थाने सुरू केली आहेत. आता २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्येही ( Atmanirbhar Bharat ) मागासवर्गीयांना अलिप्त ठेवण्यात आल्याचे गजभिये यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी तंबी दिल्यामुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी १.७५ लाख कोटी रुपये केंद्राला दिले होते. संकटकाळात वापरायचा हा निधी मोदी यांनी अगोदरच संपवून टाकला. हा निधी आताच्या ‘कोरोना’ संकटकाळात उपयोगी पडला असता.

सध्या दहा कोटी रुपये मजूर रस्त्यावर आहेत. लॉकडाऊनमुळे ते गावाकडे जात आहेत. त्यांना खायला अन्न नाही. गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबांबद्दलही मोदी सरकारने पॅकेजमध्ये फार काही दिलेले नाही.

करोडपती व्यापाऱ्यांची काळजी २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये ( Atmanirbhar Bharat ) घेतल्याचे दिसत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी देश लुटला त्यांच्यासाठीच गोरगरीबांचा पैसा मोदी सरकार देत असल्याचा आरोप गजभिये यांनी केला आहे.

महाराष्ट्राला किती निधी देणार याबाबतही संदिग्धता

केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपये निधीपैकी महाराष्ट्राला किती मिळणार याबाबत पंतप्रधान व अर्थमंत्र्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. कररुपाने मुंबई केंद्र सरकारला भक्कळ निधी देत असते.

‘कोरोना’मुळे सध्या महाराष्ट्र व मुंबई अडचणीत आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्र व मुंबईला भरघोस मदत करायला हवी. रूग्णसंख्येच्या प्रमाणात मुंबई व महाराष्ट्राला निधी द्यायला हवा. पण मोदी सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम स्थान देत असते. जास्तीत जास्त निधी ते गुजरातला वळवत असतात. २० लाख कोटीच्या पॅकेजमध्येही असेच गौडबंगाल असू शकेल, असेही गजभिये म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Yashwant Sinha : नरेंद्र मोदींच्या गळ्यातील ‘गमछा’ आता जागतिक फॅशन होईल

Politics In BJP : राम शिंदेंचा पंकजाताई, चंद्रकांतदादांवर निशाणा

Atmanirbhar Bharat Abhiyan : लोकल ब्रँड ग्लोबल करण्यावर विशेष लक्ष्य, नागरिकांच्या खात्यात पैसे थेट जमा

Memes about being ‘Atmanirbhar’ flood social media after PM Modi’s latest speech

तुषार खरात

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

6 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago