राजकीय

Mamata Banerjee : बंगालचा गुजरात होऊ देणार नाही; ममता बॅनर्जी यांचा भाजपाला इशारा

टिम लय भारी

कोलकाता : राष्ट्रगीत आणि जय हिंदचा नारा पश्चिम बंगालमधून देण्यात आला आहे. बंगाल सर्वोकृष्टतेला महत्त्व असून आम्ही बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा देत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच अलिकडेच तृणमूल काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. राज्यातील राजकारणात गद्दारांना कोणतेही स्थान नाही. समुद्रातून दोन भांडी पाणी काढले तर काही फरक पडत नाही, असे म्हण त्यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीका केली. अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यानंतर ममतांनी भाजपावर पलटवार केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, भाजपा-तृणमूल काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत हे राजकीय वैर आणखी तीव्र होत असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भाजपाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात कद्यापी होऊ देणार नाही असे म्हणत जोरदार टीका केली.

एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, बंगालची भूमी जीवना स्त्रोत असून आपल्याला ही भूमी सुरक्षित ठेवावी लागणार आहे. आपल्याला याचा अभिमान बाळगावा लागेल. बाहेरून येणाऱ्याना वाटू नये की ही भूमी गुजरातसारखीच होऊन जाईल, असे व्हायला नको. आमचा हाच संदेश आहे की, आम्ही सगळ्यांसाठीच आहोत. मानवता सगळ्यांसाठीच आहे. मग तो शीख असो, जैन असो वा ख्रिश्चन. आम्ही त्यांच्यामते फूट पाडण्याची परवानगी देणार नाही,” असे म्हणत ममतांनी भाजपवर जोरदार टीका केली.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago