राजकीय

भारती पवार व भास्कर भगरे यांच्यात होणार सरळ लढत

महायुतीच्या उमेदवार भारती पवार व महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने दिंडोरी लोकसभा निवडणुकीचे प्रथम चरण पुर्ण झाले आहे. डॉ . भारती पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडी कडुन कोण असा सवाल मतदारांच्या मनात निर्माण झाला होता.भास्कर भगरे यांचे नाव राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी निफाड येथील सभेत अग्रक्रमाने उमेदवारीसाठी घेतले होते.मात्र जे पी गावित व गोकुळ झिरवाळ यांचे नाव पुढे आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळॆ उमेदवारीत बाजी कोण मारणार याबाबत तर्कवितर्क केले जात असताना भास्कर भगरे यांचे नावावर शिक्का मोर्तब झाल्याने दिंडोरी लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.(Bharti Pawar and Bhaskar Bhagre to face each other)

भास्कर भगरे यांनी प्रचाराचा शुभारंभ वणी येथील जगदंबा मंदिरात पुजन करुन केला.कार्यकर्त्यानी जगदंबेला साकडे घातले.दरम्यान भारती पवार यांचा यापुर्वीच गाठीभेटीच्या माध्यमातुन प्रचार सुरु केला आहे.

पडड्यामागील भूमिका ठरेल निर्णायक
अस्तित्वाची लढाई व प्रतिष्ठेची कसोटी असलेल्या या निवडणुकीत जे पी गावित ,गोकुळ झिरवाळ , मजि खासदार हरीश्चन्द्र चव्हाण यांची पडद्यामागची भुमिका महत्वाची असणार आहे. किमान 450 बुथ ,तालुक्याचे आमदार ,जिल्हा परीषद सदस्य ,पंचायत समीती सदस्य ,सरपंच याबरोबर विविध सहकारी संस्था यांची भुमिका निर्णायक असु शकेल काय ही याचाही अभ्यास राजकीय जाणकार करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीबाबत विशेष लक्ष घातले. त्यामुळे उमेदवारीबाबत इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यांनतर हा तिढा सुटला.
भाजपाकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवित त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. डॉ. पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवार यांच्याकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू होता. माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी देखील दर्शवली होती. तर भाजपकडून इच्छुक असलेले अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एन.डी. गावित यांच्या नावाची देखील चर्चा होती. यातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे उमेदवारीबाबत मोठी रस्सीखेच सुरू होती. यात शरद पवारांनी पक्षाचे एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे यांच्या मर्जीतील भास्कर भगरे यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. दिंडोरी तालुका अध्यक्ष असलेले भगरे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे अखेर भास्कर भगरे हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

भुसावळ दुहेरी हत्याकांड : तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणी (double murder)…

4 hours ago

फिक्की व महाराष्ट्र चेंबरतर्फे शुक्रवार दि. ७ जून २०२४ रोजी पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील व्यवसायाच्या संधींवर चर्चासत्र

फिक्की व महाराष्ट्र चेंबरच्या पाठिंब्याने ARISE स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) च्या माध्यमातून पश्चिम आणि मध्य…

4 hours ago

कच्चं आलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

भारतात आल्याचा चहा खूप फेमस आहे. आलं (raw ginger) भाजीत सुद्धा टाकलं जातं. तुम्हाला माहित…

5 hours ago

आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शपथ

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (World Anti-Tobacco Day) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी…

5 hours ago

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ मराठी चित्रपट,संत मुक्ताबाईचा जीवनपट येणार रूपेरी पडद्यावर

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा फार मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ,…

7 hours ago

पंतप्रधान पदासाठी माझी पसंती राहुल गांधी; मल्लिकार्जुन खरगे

देशामध्ये लोकसभा निवडणूक आज संपणार आहे, आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. तर बुधवारी…

8 hours ago