राजकीय

BJP : भाजपने डाव्यांचा गड फोडला, ‘या’ शहरातील महापौरपदाचा उमेदवार पाडला

टीम लय भारी

बगंळुरु : भाजपने (BJP) बिहार आणि हैदराबादमध्ये मुसंडी मारल्याने अनेकांच्या भुवया उचावलेल्या असताना आता डाव्यांचा भक्कम गड असलेल्या केरळमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत दोन पालिका भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. स्थानिक निवडणुका असल्या तरी या निवडणुका राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली एलडीएफ, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युडीएफ आणि भाजपच्या एनडीएमध्ये सत्तेसाठी चुरस लागली आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सत्ताधारी सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडीवर असून यूडीएफ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, भाजपाने गेल्या वेळच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. त्रिवेंद्रम आणि थिरुवनंतपुरमध्ये (Thiruvanantapuram) भाजपने एलडीएफ (LDF) आणि यूडीएफच्या (UDF) तोंडच पाणी पळविले आहे.

केरळमधील 6 नगरपालिका, 941 ग्रामपंचायत, 14 जिल्हा पंचायती आणि 87 नगर पालिकांसाह 1200 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 21 हजार 893 वॉर्डामध्ये 3 टप्प्यात मतदान पार पडलं होते. आज मतमोजणी होत असून 941 ग्रामपंचायतीमध्ये एलडीएफ 503 वर पुढे आहे. तर यूडीएफ 377 आणि भाजपा 24 ठिकाणी आघाडीवर आहे. भाजपकडून आमदारकीची निवडणूक लढवलेल्या राजेश यांना या निवडणुकीत उतरवून भगवा दलाने मोठा डाव खेळला आहे. राजेश नेडुमंगड मतदारसंघातून विधानसभा लढले होते. तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकावर होते.

NDA ने महापौर पदाचा उमेदवार पाडला

थिरुवनंतपुरम आणि कोझिकोडी कार्पोरेशनमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये भाजपने दोन्ही विरोधी पक्षांना हैरान करुन सोडले होते. 100 पैकी 34 जागा भाजपने मिळवल्या होत्या. यूडीएफ तिसऱ्या क्रमांकावर गेली होती. यावेळीही भाजपने कडवी टक्कर देत डाव्यांचा महापौर पदाच्या उमेदवार एस पुष्पलता यांचा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

थिरुवनंतपुरम केरळमध्ये घुसण्याचा दरवाजा

लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा विचार केला तर थिरुवनंतपुरम महापालिका निवडणुक भाजपासाठी अतिशय महत्वाच आहे. थिरुवनंतपुरम भाजपला केरळमध्ये घुसण्याचा दरवाजा आहे. 100 वॉर्ड आणि चार विधानसभा मतदारसंघात विभागलेले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे चार पैकी एक जाग जिंकली होती. या ठिकाणी मागील पंधरा वर्षापासून माकपची सत्ता आहे. यामुळे महापौर पदाचा उमेदवार पाडल्याने भाजपला महापौर पद मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago