भाजपच्या संकल्पपत्रात आश्वासनांचा पाऊस

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचे संकल्पपत्र आज मंगळवारी जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये त्यांनी शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदु मिल येथील बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणार असल्याचे जुनेच तुणतुणे वाजवले असून आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र भाजपा प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थितीत होते. नड्डा यांनी भाजपचे संकल्पपत्र घोषित केले. त्यामध्ये ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे.

याशिवाय संकल्प पत्रात १ कोटी रोजगार, २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी, शेतकऱ्यांना १२ तास वीज अशा घोषणा,  ५ वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं ध्येय असल्याचं या संकल्पपत्रात मांडण्यात आलं आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

1. येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार उपलब्ध करणार

2. ५ वर्षात शेतीला लागणाऱ्या वीज सौर उर्जेवर देऊन १२ तास वीज देणार

3. २०२२ पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी

4. मुलभूत सेवेसाठी केंद्र सरकारच्या मदतीने ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

5. ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

6. कोकणातील १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार, पूर्व विदर्भातील पाणी पश्चिम विदर्भात आणणार, पुरात वाहून जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागासाठी वापरणार

7. भारत नेट आणि महाराष्ट्र नेटच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला इंटरनेटने जोडणार

8. शिवरायांचे स्मारक, बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणार

9. ३० हजार किमीचे रस्ते बनवणार

10. १६७ टीएमसी पाणी दुष्काळी भागात नेणार

11. मराठवाड्यात वॉटर ग्रीड राबवणार

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

10 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

11 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

13 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

13 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

14 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

14 hours ago