राजकीय

भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळेच पक्षाची संपत्ती अधिक आहे ,प्रविण दरेकर

टीम लय भारी

 मुंबई :-  देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूकींचे  वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील निवडणूक लढवणाऱ्या पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. श्रीमंत पक्षांच्या यादीत भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष सिद्ध झाला आहे.  देशातील सात राष्ट्रीय पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.( BJP  largest party in the country, the party’s wealth is more,  Darekar)

यात भाजप पक्षाची मालमता अधिक असल्याने सर्वच स्तरातून भाजपवर टीका होत आहे. या टीकाकारांना भाजप नेते तथा विधान परिषदेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हे सुद्धा वाचा

वरळीतील जांबोरी मैदानाच्या नामांतरावरून भाजपने चढवला शिवसेनेवर हल्ला

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला धक्का , देवेंद्र फडणवीस

भाजप नेते केशव उपाध्ये यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

BJP Richest Party In 2019-20, Followed By…No, It’s Not Congress: Report

प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, ‘भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक पक्ष रसातळाला जात आहेत, त्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे, मात्र भाजप हा दिवसेंदिवस समृद्ध होताना दिसत आहे. मोठा पक्ष म्हटल्यावर कार्यकर्त्यांची संपत्ती जास्त असणारच. सभासद जास्त, लोकांची पसंती जास्त याचाचं दुखणं अन्य पक्षांना आहे.’

‘भाजपच्या मागे कार्यकर्त्यांची संपत्ती आहे, जनतेची संपत्ती आणि विश्वास आहे. मात्र या संपत्ती विषयी कोणी बोलताना दिसत नाही. मदत करायला विश्वास लागतो आणि तो विश्वास भाजपने जनतेला दिला आहे.’ असे प्रत्युत्तर प्रविण दरेकरांनी टीकाकारांना दिले आहे.

भाजपची संपत्ती ४ हजार ८४७ कोटी ७८ लाख असून दुसऱ्या क्रमांकावरील बसपाची ६९८ कोटी ३३ लाख असल्याचे जाहीर केले आहे. तर काँग्रेसची संपत्ती ५८८ कोटी १६ लाख रुपये असून काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने २०१९-२० या वर्षात ४ हजार ८४७ कोटी ७८ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली, जी सर्व राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक आहे. यानंतर बसपने ६९८ कोटी ३३ लाख आणि काँग्रेसने ५८८ कोटी १६ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

 

 

 

 

 

Pratikesh Patil

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

3 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

16 hours ago