राजकीय

भविष्यवाणी खरी ठरत नसल्यानं भाजपा नेते हताश, त्यामुळेच तारीख पे तारीख; नवाब मलिकांचा टोला

टीम लय भारी

मुंबई :- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याने तर्कविर्तकांच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राज्यात सत्ता येणार ही भाजपची भविष्यवाणी खरी ठरत नाही. त्यामुळे भाजप नेत्यांना नैराश्य आले असून पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी पक्षांतर करू नये म्हणूनच ते तारीख पे तारीख देत आहेत, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे (Nawab Malik, the spokesperson of the NCP, has set the target).

तर, दुसरीकडे लवकरच भाजपा सत्तेत येणार असल्याची विधाने भाजपा नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाष्य केले आहे. “इतर पक्षातून भाजपामध्ये गेलेले आमदार स्वगृही परतू नये म्हणूनच भाजपा सत्तेत येण्याची तारीख पे तारीख देत आहे,” असा टोला नवाब मलिक यांनी लगावला (“MLAs from other parties who have joined the BJP should not return home, so the BJP is giving a pay date to come to power,” said Nawab Malik).

“तोल ढासळलेल्या व्यक्तीवर उपचार करायचे असतात”;संजय राऊतांची चंद्रकांत पाटीलांना बोचरी टिका

पवार–फडणवीस भेटीवरून शिवसेनेचा भाजपला सणसणीत टोला

HC issues notice to CBSE, Centre and Delhi on petition seeking changes to Class 10 marking policy

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मीडियाशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे लोक तारीख पे तारीख देत आहेत. सत्ता येणार…सत्ता येणार… ही भाजपची एकही भविष्यवाणी सत्य होत नाहीये. त्यामुळेच ते हताश होवून आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत असल्याची टीका नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

आघाडीला धोका नाही

इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये या भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे भाजपकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे आघाडीला कसलाही धोका नाही, असे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी स्पष्ट केले आहे.

संभ्रम निर्माण करण्याचे काम

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. त्यामुळे जनता संतुष्ट आहे. परंतु सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याची टीकाही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली.

काय म्हणाले होते फडणवीस?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. सध्या कोविडचा काळ आहे. आमचे सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचे लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेले तर बघू, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला होता.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago