राजकीय

भाजप नेते केशव उपाध्ये यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई:- ‘टिपू सुलतान’ नामकरणावरुन भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे.असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येणार असल्याचे फलक परिसरात लागले होते.( BJP leader Keshav Upadhyay castigates Shiv Sena)

मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले होते. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रजासत्ताक दिनी क्रीडा संकुलाचे टिपू सुलतानच्या नावावरून वाद, भाजपचे धरणे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचा नितेश राणेंना दणका

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसमध्ये फूट, स्टार प्रचारक भाजपात

Ruckus over Speaker’s election – Thackeray’s letter belittled and denigrated the highest constitutional office of the Governor

दरम्यान या मुद्द्यावरून आज भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘ही तर संधीसाधू सेना. कॉंग्रेसने जन्माला घातली, मुस्लिमलीगच्या मांडीवर बसली. आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या , त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!,’ अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत शिवसेनेवर निशाण साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये मम्हंटले आहे की, ही तर संधीसाधू सेना. कॉंग्रेसने जन्माला घातली. मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली, कॉंग्रेससोबत रमली, कॉंग्रेसशी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली, आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली. आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!’असे ट्विट उपाध्ये यांनी केली.

मुंबई-टिपू सुलतानच्या नावावरुन भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. टिपू सुलतान ब्रिटिशांविरोधात लढले. त्या काळी ते ब्रिटिशांशी लढताना शहीद झाले. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते. मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा संकुलाला ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असे नाव देण्यात आले आहे. त्यावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा; नरेन्द्र मोदी

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…

43 mins ago

विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे उत्तर द्यावे:डॉ.भारती पवार

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…

1 hour ago

राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा: डॉ. भालचंद्र मुणगेकर

लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून…

2 hours ago

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा: प्रगती अहिर

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना ( Prajwal Revanna ) याने अनेक…

2 hours ago

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा: नाना पटोले

काँग्रेसने ( Congress) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची…

3 hours ago

कलर्स मराठीचा नवीन शो ‘अबीर गुलाल’चा लक्षवेधी प्रोमो रिलीज

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स (Colors Marathi) मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला…

3 hours ago