राजकीय

भाजपच्या नेत्यांची खुमखुमी, नरेंद्र मोदींची करणार फजिती

लय भारी ची टीम नाशिक येथील पिंपळगाव दिंडोरी येथे पोहोचली असून निवडणुकी संदर्भात बऱ्याच मतदारांशी संपादक तुषार खरात यांनी संवाद साधला आहे(BJP leaders will make fun of Narendra Modi). पिंपळगाव येथे एका आगळ्यावेगळ्या अनुभवाला लय भारी च्या टीमला सामोरे जावे लागले. सरकारच्या कामावर नाराजी दाखवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मीडियालाही दोषी ठरवत त्याविषयीचा रोष लय भारी समोर व्यक्त केला. मोदी सरकारने पंधरा लाखाची आस लावून दिली फक्त, देशासाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यां साठी अच्छे दिन कधी आले ते माहितीच नाही. सध्याचे सरकार खोटं बोलतं पण रेटून बोलतं, खुर्चीवर बसले की सगळे सत्ताधीश सारखेच. यासोबतच बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवसेनेच्या पक्ष फुटीवर शेतकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. विद्यमान सरकार हे फक्त त्यांचं घर भरतंय त्यामुळे लवकरच नाशिक मध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेत मोदींचे स्वागत कांद्यांनी करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांसारख्या भ्रष्ट नेत्यांवर एसआयटी लावायची सोडून जरांगेंना त्यात अडकवलं गेलं, मराठा आरक्षण हे केवळ फडणवीसन मुळे होता होता राहिला असेही शेतकरी लय भारी ला म्हणाले. शेतकरी मतदारांसोबतच शेतकरी संघटनेचे नाशिक विभागातील अध्यक्ष शंकरराव डिकले यांच्याशी संवाद साधला असता निवडणुकीच्या वेळेस त्यांना कसं नजर कैदेत ठेवलं जातं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून न घेता शेतकऱ्यांनाच कसा त्रास दिला जातो त्यांनी संपादक तुषार खरात यांच्याशी बोलताना सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

3 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

3 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

5 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

5 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

5 days ago