राजकीय

भाजपचा शब्द धुळ्यात वंचितने पाळला

राजकारणात कुणावरच विश्वास ठेवायचा नसतो हे सातत्याने सांगितले जाते . त्याचा अनुभव लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात अनेकांना रोज येत आहे. उत्तर महाराष्ट्र्रात विद्यमान खासदारांना डावलले गेल्याने त्यांनी थेट दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरला. त्यात काही सनदी अधिकाऱ्यांनी लोकसभेसाठी तयारी सुरु केली होती. मात्र आता भाजपची तिकीट वाटपातील वाद पाहता त्यांचे स्वप्न आणि भाजपचा शब्द देखील अपूर्ण राहिला आहे मात्र तो शब्द वंचित बहुजन आघाडीने धुळे येथुन पूर्ण करून दाखवला असून अब्दुल रहमान या सेवनिवुर्त्त अधिकाऱ्याला उमेदवारी दिली आहे.( BJP nominates IPS officer from Dhule )

राज्य सरकारच्या मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या परदेशी यांनी संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद मतदार संघात विविध उपक्रमांचा धडाका लावला होता. होळीच्या काळात बंजारा समाजासोबत त्यांनी केलेले नृत्य लक्षवेधी ठरले होते. त्यांनी किल्लारी भूकंपाच्या काळात केलेल्या कामाच्या आधारे खासगी सर्वेक्षण संस्थांकडून चाचपणीही करण्यात येत होती. समृद्धी महामार्गामुळे चर्चेत असलेले आणि अनेक मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले राधेश्याम मोपलवार हे हिंगोली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत होती.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून दूर केल्यानंतर मोपलवार यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी या वॉर रूमची स्थापना केली होती. काही महिन्यांपूर्वी मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमचा अचानक राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांचे नाव गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असून राजकीय वर्तुळातील त्यांचा वावरही वाढला होता. भाजपकडून धुळे मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती आणि त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी चालवली होती. मात्र सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचेही राजकारण प्रवेशाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

रहमान होते राज्य मानवाधिकारचे महानिरीक्षक

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत धुळे मतदारसंघातून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रहमान यांनी डिसेंबर २०१९ मध्ये राजीनामा दिला. त्यावेळी ते राज्य मानवाधिकार आयोगाचे महानिरीक्षक होते. महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली. ‘एब्सेंट इन पॉलिटिक्स ॲण्ड पावर, पॉलिटिकल एक्सक्लूज़न ऑफ इंडियन मुस्लिम्स’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago