राजकीय

वंचितांना मदत करून वाढदिवस साजरा, भाजप पदाधिकाऱ्याचे कौतुकास्पद कार्य

टीम लय भारी

मुंबई : वाढदिवस म्हटला की, अनेकजण बॅनरबाजी, मौजमजा, पैशाची उधळपट्टी असे प्रकार करतात. परंतु भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने आपला वाढदिवस दुर्लक्षित व वंचित लोकांसोबत साजरा केला आहे (BJP woman office bearer has celebrated her birthday with the neglected and deprived people).

डॉ. स्मिता काळे – बंडगर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या संयोजक म्हणून डॉ. काळे कार्यरत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच, २ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो.

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

BJP : भाजपने डाव्यांचा गड फोडला, ‘या’ शहरातील महापौरपदाचा उमेदवार पाडला

डॉ. स्मिता काळे – बंडगर

दरवर्षी प्रमाणेच यंदाही त्यांनी सामाजिक कार्य करून आपला वाढदिवस साजरा केला. रस्त्यावरील मुलांना त्यांनी साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट असे स्वच्छतेचे साहित्य दिले. या मुलांना भोजन वाटप केले. तसेच बिस्कीटांचे पुढेही दिले.

डॉ. स्मिता यांनी सामाजिक कार्य करून आपला वाढदिवस साजरा केला

समाजामध्ये दुर्लक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतियपंथियांनाही काळे यांनी साड्या व अन्न धान्याचे वाटप केले. काळे या स्वतः डॉक्टर आहेत. त्यांचा दवाखाना सुद्धा आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी लोकांच्या विविध आरोग्य तपासणी मोफत करून दिल्या.

BJP : विकास लवटे यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदी निवड

BJP announces candidates for Maharashtra, Mizoram and Telangana assembly bypolls

डॉ. स्मिता काळे यांचे वडील स्वर्गीय आबासाहेब बंडगर यांचे सामाजिक कार्य थोर आहे. स्वर्गीय बंडगर यांनी घाटकोपर – विक्रोळी परिसरात शिक्षणाचे मोठे कार्य केले आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा सुरू केल्या होत्या. या शाळांतून आजही शिक्षणाचे कार्य अवितर सुरू आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ. स्मिता काळे यांनीही सामाजिक कार्याचा वसा जपला आहे.

‘कोरोना’ काळातही डॉ. स्मिता काळे यांनी लोकांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

7 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

7 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago