राजकीय

नवे आले जुने गेले; केंद्रीय मंत्रिमंडळात 43 नवे चेहरे तर जुन्या 12 चेहऱ्यांना डच्चू

टीम लय भारी

मुंबई:- केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्तार होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आज या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. आज दिल्लीतील राजकीय गजडामोडींना वेग आला आहे. नुकतीच केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील या नेत्यांची नावे समाविष्ट आहे (The central government has released a list of 43 leaders who have been sworn in as ministers).

आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातुन नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे.

राणे, कपिल पाटील दिल्लीत मोदींच्या निवासस्थानी दाखल; दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे निश्चित

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 7 रेसकोर्स हे निवासस्थान हे राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. ज्या संभाव्य नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यांच्याशी मोदींनी आज संवाद साधला. सरकारची कामे, देशाची आणि राज्यांची परिस्थिती, आव्हाने आणि नव्या मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला (Modi interacted with potential ministers about the expectations from the new ministers).

या 43 नेत्यांचा मंत्रीमंडळात समावेश

केंद्रीय मंत्री मंडळात, नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, डॉ. राजकुमार सिंह, डॉ. एल. मुरगन, निसित प्रमाणिक, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलाजे, भानूप्रताप सिंग वर्मा, दर्शना विक्रम जरदोष, मीनाक्षी लेखी, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेन्द्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, अनुप्रिया सिंह पटेल, डॉ. सत्यपाल सिंह बघेल,  अनपुर्णा देवी, ए. नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवूसिंह, भागवत खुपा, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, बिस्वेश्वर तडू, शंतनु ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, असे या 43 नेत्यांची मंत्रीमंडळात समावेश होणार आहे.

शरद पवार भावुक; दिलीप कुमारांसोबतच्या आठवणींना दिला उजळा

Narayan Rane’s journey from Shiv Sena ‘shakha pramukh’ to Union minister

मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याने काही विद्यामान केंद्रीय मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातून ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण १२ मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.

या 12 मंत्र्यांनी दिला राजीनाम

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, राज्य मंत्री पर्यावरण मंत्रालय बाबुल सुप्रियो, महिला आणि बाल विकास राज्य मंत्री देबोश्री चौधरी, मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, रसायन व खते मंत्री सदानंद गौडा, श्रम आणि रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री – शिक्षण तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय संजय धोत्रे, राज्यमंत्री – जलशक्ती मंत्रालयात रतन लाल कटारिया, राज्यमंत्री – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यागासहीत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्रालय प्रताप सारंगी, सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गहलोत, या 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

19 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

19 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

20 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

21 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

21 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

23 hours ago