राजकीय

CHECKMATE : रश्मी ठाकरे यांच्या इच्छेमुळे उद्धव ठाकरेंना मिळाले मुख्यमंत्रीपद

टीम लय भारी

मुंबई : माझ्या पतीच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा भाजप गैरफायदा घेत आहे. त्यामुळे भाजपसोबतची युती तुटावी. कै. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनानुसार शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ( CHECKMATE ) अशी इच्छा रश्मी ठाकरे यांची होती.

भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जावे यासाठी रश्मी ठाकरे आग्रही होत्या. वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘CHECKMATE : How the BJP won and lost Maharashtra’ या पुस्तकात उपरोक्त घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.

‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तेत येण्यापूर्वी राज्यात राजकीय घमासान झाले होते. त्यावेळी राज्यात पडद्यामागे अनेक घटना घडल्या होत्या ( CHECKMATE ). या घटनांबद्दल सामान्य लोकांना काहीही माहित नाही. परंतु पत्रकार सुर्यवंशी यांनी या सगळ्या घटनांचा शोध घेऊन त्या पुस्तकबद्ध केल्या आहेत.

सरकार बनविण्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. त्यावेळी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे व सुभाष देसाई या तिघांच्या नावांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू झाली होती. परंतु या तिन्ही नावांवर शरद पवार यांनी फुली मारली.

आदित्य ठाकरे फारच लहान आहेत. अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारखे वरिष्ठ नेते आदित्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार होणार नाहीत. सुभाष देसाई मंत्रीमंडळाच्या बैठकीतही डुलक्या घेतात. एकनाथ शिंदे हे सगळ्यांसाठी स्विकारार्ह नाव नाही, अशी भावना शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्या जवळ व्यक्त केली.

शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात वांद्रे येथील ‘ताज लॅण्ड’ हॉटेलमध्ये सरकार बनविण्याबाबत बैठक झाली होती. यावेळी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

ही बैठक संपवून सर्व नेते वरून खाली उतरत होते. त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची भावना संजय राऊत यांच्याजवळ व्यक्त केली.

संजय राऊत तिथून लगेचच परत वर गेले, अन् उद्धव ठाकरेंना भेटले. त्या ठिकाणी आदित्य ठाकरेही बसले होते. आदित्य, शिंदे व देसाईंच्या मुख्यमंत्रीपदाला पवार यांचा विरोध आहे. त्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावे असे पवार यांचे ( CHECKMATE ) म्हणणे असल्याचे राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले.

त्यावर उद्धव ठाकरे यांची अवघडल्यासारखी स्थिती झाली. मी तर कधीच सरकार चालवलेले नाही असे उद्धव यांनी मत व्यक्त केले. तिथे असलेले आदित्य ठाकरे त्यावेळी म्हणाले, ‘बाबा, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. हे आव्हान तुम्ही स्विकारलेच पाहीजे.’

तत्पुर्वी काही दिवस अगोदर संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुंबईतल्या बंगल्यावर पहिली भेट घेतली होती. शिवसेना भाजपशी काडीमोड घेईल याबाबत पवार यांना खात्री नव्हती. त्यांनी ही शंका संजय राऊत यांच्याजवळ बोलून दाखविली.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला व तो शरद पवार यांच्याकडे दिला. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली. संजय राऊत हे आमचे प्रतिनिधी आहेत. तुमच्यासोबत वाटाघाटी करण्याकरीता त्यांना मी सगळे अधिकार दिलेले आहेत. ते तुमच्याशी चर्चा करतील तीच आमची भूमिका आहे असे उद्धव यांनी पवारांना सांगितले.

संजय राऊत यांचे शिवसेनेत एवढे मोठे स्थान बळकट झाल्याबद्दल पवारांना नवल वाटले.

त्यानंतर संजय राऊत व शरद पवार यांच्यात दुसरी भेट झाली. सगळे पत्रकार व विरोधी पक्षांनाही गुंगारा देवून ही भेट झाली होती. शरद पवार आपल्या मुंबईतील बंगल्यावरून पुण्याला निघाले. मुंबई – पुणे महामार्गावर कळंबोलीच्या पुढे मॅकडॉनल्ड रेस्टॉरन्ट आहे. त्याच्या पुढे संजय राऊत गाडीत बसून पवारांची वाट पाहात होते. पवारांची गाडी आल्यानंतर राऊत आपल्या गाडीतून उतरले आणि पवारांच्या गाडीत बसले. पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई सुद्धा होत्या.

पवार व राऊत यांच्यात तासभर खलबते ( CHECKMATE ) झाली. तिन्ही पक्षांचे सरकार बनू शकते हा विश्वास राऊत यांनी पवार यांना दिला. त्यावर प्रयत्न करता येतील असे पवार म्हणाले. मी सोनिया गांधींशी बोलतो. तुम्हीही राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत सलोख्याच्या दृष्टीने बोलणी सुरू करा असे पवारांनी सुचविले.

बोलणी पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत गाडीतून उतरले आणि आपल्या गाडीने मुंबईला परतले. या भेटीची कानोकान कुणालाच खबर लागली नव्हती. पत्रकारांना व विरोधकांनाही वाटले, पवार पुण्याला निघून गेले आहेत. त्यामुळे तूर्त वाटाघाटी ( CHECKMATE ) झालेल्या नाहीत. परंतु पवार व राऊंत यांच्यात भेट होऊन मोठी खलबते झाली होती असे सुर्यवंशी यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी मोदी सरकारच्या सुचना बसविल्या धाब्यावर

तुषार खरात

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

10 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

12 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

12 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

13 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

13 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

13 hours ago