राजकीय

ज्या पेशव्यांनी होळकरांना त्रास दिला, त्याच पेशव्यांच्या टोप्या कशाला; छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

राज्य सरकारने अहिल्यादेवी नगर नाव दिले ठिक आहे. परंतु अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास माहित आहे का? यशवंतराव होळकर यांनी सैन्य गोळा करून इंग्रजांना धुळ चारली आणि दुसरा राज्याभिषेक हा यशवंतराव होळकर यांचा झाला. शहऱाला नाव देण्याच्या कार्यक्रम झाला त्यात टोप्या घालण्यात आल्या त्या पेशव्यांच्या होत्या. ज्या पेशव्यांनी होळकरांना त्रास दिला त्याच पेशव्यांच्या टोप्या कशाला दिल्या, यांना काय इतिहास माहित नाही, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारचे वाभाडे काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्यमहोत्सव षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

राज्यातील हिंदू-मुस्लीम दंगे, वारकऱ्यांवरील लाठीचार्ज, महापुरुषांचा अपमान तसेच देशातील मणीपुरमधील दंगे, संसदेच्या लोकार्पण सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम अशा अनेक मुद्द्यावर आज छगन भुजबळ यांनी राज्यतील शिंदे-फडणवीस सरकारवर तसेच देशातील मोदी सरकारवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने गोरगरीब सर्व समाजासाठी निर्णय घेतले. आता तर अपमान केले जात आहेत. मुख्यमंत्री यांच्यावर बोलल्यावर चार तासात आरोपी पकडले जातात मात्र सावित्रीबाई फुले यांच्यावर गलिच्छ बोलणार्‍याला अद्याप अटक करण्यात आली नाही. महाराष्ट्र सदनात सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हलवले. वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातो. हे तुमचे हिंदुत्व आहे का असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला.

तुम्ही इतिहास काढून टाकता तुम्हाला इतिहास माफ करणार नाही. रोज हिंदू – मुस्लीम केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम समाज कसा होता हे सांगतानाच औरंगजेब औरंगजेब काय करताय, कोण आहे औरंगजेब… निवडणूक आली की दंगे घडवले जातात. त्यात मरतं कोण गरीब दलित आणि मुस्लिम लोकं या दंगलीत गरीबांची मुलं आत जातात, नेत्यांची जातात का? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

दिल्लीत डबल इंजिन सरकार बोलतात परंतु ट्रीपल इंजिन एकावर एक चढले ३०० लोकं मेली तरी काहीजण झेंडे दाखवत आहेत. आता त्या संसदेत काय तो दांडा घेऊन आले त्याला सेनगवर काय ते बोलतात ते घेऊन आले उघडेबंब लोक… असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला…

हे सुद्धा वाचा

आव्हानाला सामोरे जाणे तुमचं-माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे; शरद पवारांनी फुंकले रणशिंग

ठाकरे कुटुंबियांसह मातोश्री बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; शिंदे-फडणवीसांना पाठवले पत्र

मणीपूरची परिस्थिती काय आहे. दोनशे लोक मारले गेले. काहीच करत नाहीत. आता महाराष्ट्रात तर नवीन सर्व्हे करण्यात आला त्यात ‘देशात मोदी आणि राज्यात शिंदे’ मात्र देवेंद्र फडणवीस गुल… असा टोला लगावतानाच दुसर्‍या दिवशी पुन्हा फोटो छापून शिंदेसेना फक्त… हा फेविकॉलचा मजबूत जोड बोलता पण हा असला कसला डुप्लिकेट फेविकॉल तुमचा अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शिंदे – फडणवीस सरकारची खिल्ली उडवली.  देशाचे सगळे लक्ष सध्या पवारसाहेबांकडे आहे. मोदी सांगतात पवारसाहेबांची करंगळी पकडून राजकारणात आलो परंतु मोदीसाहेब, पवारसाहेब हे गोरगरीबांसाठी झटत आहेत. ‘चिराग बनकर जल सकोगे, आप मोम बनकर पिघल सकते हो क्या’… अशा शायरीने छगन भुजबळ यांनी भाषणाचा शेवट केला.

प्रदीप माळी

Recent Posts

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

27 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

1 hour ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago