राजकीय

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बेस्ट सीएम आहेत मनसेचा खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये नुकसाव झाले आहे. पण या वादळाचा सर्वात जास्त फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. त्यामुळे या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल कोकण दौरा केला आहे.  चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्र्याच्या या दौऱ्यावरून उध्दव ठाकरे बेस्ट सीएम आहेत असा मनसेने खोचक टोला लगावला आहे (The MNS has said that Uddhav Thackeray is the best CM from this visit of the Chief Minister).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. उध्दव ठाकरे खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, असा खोचक टोला मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आकाशातून नाही तर जमिनीवरून पाहणी करणार, मुख्यमंत्र्याचा मोदींना टोला

कोकण किनारपट्टीची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला

For Mumbai’s street vendors during Covid-19, precarious livelihoods signal an uncertain future

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. परंतु, विरोधकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या या धावत्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून 10 किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा, अशी खरमरीत टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती.

मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही’

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कोकण दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.

कोकणात आलेले चक्रीवादळ भीषण होते. या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणे शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असे ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

5 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

5 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

5 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago