राजकीय

चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी नेत्याने पोलिसांत केली तक्रार

टीम लय भारी

मुंबई:- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात राष्ट्रवादी नेत्याने पोलिसांत तक्रार केली आहे. चित्रा वाघ यांनी शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे. मेहबूब शेख यांनी बीडच्या शिरुर कासार पोलिस ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दिली आहे (Chitra Wagh against NCP leader has filed case in Police Station).

चित्रा वाघ 18 तारखेला शिरुरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला बलात्कारी म्हटले तसेच माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी केली, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.

Video : सांगलीत मुख्यमंत्री दौऱ्या दरम्यान भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले

राहुल गांधींनी इंधन दरवाढीविरोधात दिल्लीत काढली सायकल रॅली

मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिस तक्रार

18 जुलै 2021 रोजी शिवाजी एकनाथ पवार जिल्हा परिषद सदस्य बीड यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर असंख्य कार्यकर्ते हजर होते. चित्रा वाघ यांनी शिरुर येथे येऊन माझी बदनामी व्हावी या उद्देशाने मी एका मुलीवर बलात्कार केला असल्याचे सांगत, राज्य सरकार मेहबूब शेखला अटक करत नाही असे चित्रा वाघ म्हणाल्या. (Chitra Wagh has come to Shirur and defamed me).

चित्रा वाघ आणि मेहबूब शेख

मेहबूब शेख यांचे नेमकी प्रकरण काय आहे

औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी मागील काळात केले.

क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे पत्रीसरकार

NCP leader Anil Deshmukh skips fourth ED summons in money laundering case

मेहबूब शेख हे बीड जिल्ह्यातील शिरुरचे रहिवासी आहेत. साहजिक शिरुरला गेल्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावरती टीका करताना त्यांना बलात्कारी म्हटल्याचं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे.  मेहबूब शेख यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.

वास्तविक माझ्यावर झालेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी तपास करुन तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र तरीही माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले आणि माझ्या बदनामीचा प्रयत्न केला, असे मेहबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाची व्हिडीओ क्लिप काही पत्रकार मित्रांनी मला दाखवली, जी पाहिल्यानंतर मला खूप मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली, असे मेहबूब शेख यांनी म्हटले आहे (Chitra Wagh allegation made me A video clip shown to me by some journalist friends).

Sagar Gaikwad

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

16 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

17 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

17 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

7 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago