राजकीय

न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी CBIला दिला मोलाचा सल्ला

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Cji Dy Chandrachud ) यांनी तपास संस्थांना मोलाचा सल्ला दिला. देशातील प्रमुख तपास संस्थांना (CBI) त्यांच्याकडील मूळ जबाबदारीच्या तुलनेत कमी महत्त्वाच्या प्रकरणांवर काम करावे लागत आहे. त्यांनी केवळ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि देशाच्या विरोधात गुन्हा घडल्याच्या प्रकरणांवरच लक्ष केंद्रित करावे, असं न्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. त्यांचे हे वक्तव्य चांगलच चर्चेत आलं आहे.(Cji Dy Chandrachud Supreme Court Advice CBI)

सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त २० व्या डीपी कोहली मेमोरिअल व्याख्यानात न्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. यावेळी त्यांनी तपास संस्थांना त्यांच्या मूळ जबाबदारीची जाणीव करुन दिली.

काय म्हणाले न्यायाधीश चंद्रचूड?

आज देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. सीबीआयला भ्रष्टाचारविरोधी तपास यंत्रणांच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यास सांगितले जात आहे.

लोकसभेच्या उमेदवारी आधिच छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

यामुळे सीबीआयवर आपल्या भूमिकेवर ठाम राहण्यास मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या मर्यादित व्याप्तीमुळे प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ अशा प्रकरणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत. राष्ट्राविरुद्धच्या आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणे अयोग्य आहे.

भाजप प्रवेशासाठी एकनाथ खडसे दिल्ली दौऱ्यावर

तसेच, तपास संस्थांनी तपास प्रक्रियेचे डिजिटायझेशन करावे आणि त्याची सुरुवात एफआयआर नोंदविण्यापासूनच करावी. तक्रारींची प्रचंड संख्या पाहता तपासाला होणारा विलंब टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा. ‘एआय’ आणि इतर तंत्रज्ञानाबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जाव्यात. यासोबतच, तपास संस्थांच्या रचनेतही सुधारणा आवश्‍यक असल्याचेही न्यायाधीश चंद्रचूड यावेळी म्हणाले.

धनश्री ओतारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

10 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

11 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

13 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

13 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

14 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

15 hours ago