राजकीय

आमदारांसाठी शिकवणीचे आयोजन

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय- प्रक्षिशण केंद्रातर्फे राज्यातील आमदारांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिकवणीचे आयोजन फक्त दोन दिवसांचे असणार आहे. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर, २०२१ रोजी आणि बुधवार दि. ६ ऑक्टोबर, २०२१ रोजी असणार आहे (CM Uddhav Thackeray inaugurated the workshop of MLAs).

मंगळवारी दुपारी १२.३० ते ५.३० वाजता, तर बुधवारी सकाळी ११.०० ते १.३० यावेळेत शिकवणी असणार आहे. मुंबई येथील विधान भवन येथे “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात… ” . या संकल्पनेवर आधारित हे कार्यशाळेचे आयोजन असणार आहे.

#VidhanSabha : ज्युनियर आर. आर. पाटलांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा

पीडब्ल्यूडीचा प्रताप; कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठाची जबाबदारी, ती सुद्धा हद्द बदलून

या दोन दिवसीय आमदारांच्या कार्यशाळेचे उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री अॅड.अनिल परब, विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस  वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, संसदीय कार्य राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

अजित पवारांच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी घसघशीत तरतूद, शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना; जाणून घ्या बजेटमध्ये कुणाला काय मिळाले ?

Maharashtra CM Uddhav Thackeray: Mahatma Gandhi, Lal Bahadur Shastri continue to be guiding lights

अर्थसंकल्प आणि त्यातील आकडेवारी समजणे क्लिष्ट, गुंतागुंतीचे असते. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांच्या मतदार संघातील विकास योजना यांचा सुयोग्य मेळ साधता यावा, यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेची आखणी व विषयांची निवड करण्यात आली आहे.

या दोन दिवसीय कार्यशाळेत अ) अर्थसंकल्पाची प्रक्रिया ब) अर्थसंकल्पीय प्रकाशने समजावून घेताना (उदाहरणार्थ आर्थिक पाहणी अहवाल… राज्याच्या प्रगतीचे प्रतिबिंब) क) अर्थसंकल्पावरील चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग ड) विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी व त्याचा सुनियोजित वापर इ) अर्थसंकल्पातून होणारी विकासकामे, त्यांचे नियोजन आणि पाठपुरावा या विषयांवर

कीर्ती घाग

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

16 mins ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

32 mins ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

2 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago