राजकीय

संजय राऊतांच्या नारायण राणेंना शिवसेनेच्या भाषेत शुभेच्छा

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रीय मंत्री मंडळाचे काल विस्तार पार पडला. यात महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रीपद मिळाले आहेत. यावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग असं खातं त्यांना दिलं. राणेंची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. राणे चांगले काम करतील असे म्हणत शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत (Congratulations to Sanjay Raut Narayan Rane in Shiv Sena language).

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. पण त्यांना जे पद मिळाले त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत (Shiv Sena leader Sanjay Raut has said that employment and industries should be revived).

नवे आले जुने गेले; केंद्रीय मंत्रिमंडळात 43 नवे चेहरे तर जुन्या 12 चेहऱ्यांना डच्चू

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावे. मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचे आव्हान राणेंसमोर आहे. रोजगार निर्मितीचे काम त्यांच्या पुढे आहे. हा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा विषय नाही. राणे चांगले काम करतील. ते महाराष्ट्रात उद्योग आणतील असा विश्वास आहे, असे संजय राऊत म्हणाले (It is believed that they will bring industry in Maharashtra, said Sanjay Raut).

नक्कीच नारायण राणेंना मंत्री केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग असे खाते त्यांना दिले. राणेंची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. अनेक पदे सांभाळली आहेत, असे सांगतानाच राणेंपुढे रोजगार वाढवण्याचे मोठे काम किंवा आव्हान आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राणे, कपिल पाटील दिल्लीत मोदींच्या निवासस्थानी दाखल; दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे निश्चित

Narayan Rane in Modi ministry: BJP says his inclusion got nothing to do with Sena, Raut underplays too

ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या जात आहे. बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. मोदींनी पत्ते पिसले आहेत ते बरोबर आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडलेला आहे.

शिवसेनेला कोकणात फटका देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं आहे का?, असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावली. शिवसेनेला फटका देण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. मंत्रिपदं ही देशाची सेवा करण्यासाठी दिली जातात.

शिवसेनेला फटका देण्यासाठी, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा विरोधकांना फटका देण्यासाठी मंत्रिपदाची खिरापत वाटली जात नाही. तसे असेल तर हा घटनेचा भंग आहे, असे सांगतानाच शिवसेनेला फटका देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिले असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. देशाचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी मंत्रिपद दिले जाते. त्या व्यक्तिचे योगदान पाहून मंत्रिपद दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर संजय राऊत म्हणाले खरतर भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी नवे चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा चिमटही राऊतांनी यावेळी भाजपला काढला आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

19 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

19 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

20 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

21 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

21 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

23 hours ago