‘शिवसेनेने पाठिंबा दिला तर काँग्रेस सत्ता स्थापनेचा विचार करेल’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपने सरकार स्थापन केले तर ते बहुमताअभावी पडेल. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण येऊ शकते. परंतु शिवसेनेने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तर आम्ही सरकार स्थापन करू शकतो, असे विधान काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केले आहे.

भाजप व शिवसेनेमधील संबंध कमालीचे उसवले आहेत. त्यामुळे सर्वात जास्त आमदार असून सुद्धा शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही. अशातच राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. राज्यपालांचे हे निमंत्रण स्विकारून भाजपने सत्ता स्थापन केली तरी विधानसभेमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे भाजपचे अल्पमतातील सरकार लगेचच कोसळेल. दुसरा पर्याय म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन होऊ शकते असे आता बोलले जात आहे. किंबहूना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘भाजपचे सरकार शिवसेनेने पाडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार देणार’

VIDEO : शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

राज्यपालांनी भाजपच्या बहुमताची खात्री करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण देवरा यांनी आता शिवसेनेनेच आम्हाला पाठिंबा द्यावा अशा आशयाचे विधान केले आहे. शिवसेनेने पाठिंबा दिला तर आम्ही सरकार स्थापन करू शकतो असे देवरा यांनी म्हटले आहे.

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

10 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

12 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

14 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

14 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

15 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

15 hours ago