राजकीय

नाशिक लोकसभेवर काॅग्रेसचाही दावा

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असतांना सांगली,भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत असल्यास त्याच धर्तीवर नाशिक लोकसभेची जागा देखील लढवावी अशी मागणी कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. नाशिक हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण गेली अनेक वर्षापासून हि जागा कॉंग्रेस पक्ष लढला नाही. पण खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला नाशिक शहरात व त्रंबकेश्वर येथे अभूतपूर्व प्रतिसाद प्राप्त झाला असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे.भाजपच्या जातीयवादी व हुकुमशाही प्रवृत्तीला जनता वैतागली आहे.(Congress claims Nashik Lok Sabha seat)

.कॉंग्रेसचे कै.गो.ह देशपांडे , कै.यशवंतराव चव्हाण , कै.मुरलीधर माने,प्रताप वाघ, कै.वसंतराव पवार,कै.माधवराव पाटील असे अनेक खासदार या मतदारसंघातून निवडणून गेले आहे.त्यावेळेस हा मतदारसंघ नाशिक,निफाड,येवला ,चांदवड,सिन्नर ,अकोला एवढा मोठा मतदारसंघ असतांना सुद्धा या मतदारसंघात कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला. परंतु गेल्या चार टर्म पासून हा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन नाशिक शहरांत चार आमदार व सिन्नर,इगतपुरी त्रंबक मिळून सहा विधानसभा मिळून नाशिक लोकसभा मतदारसंघ तयार झाला.नाशिक लोकसभा मतदार संघात कडवी झुंज देण्याची क्षमता असलेले उमेद्वार कॉंग्रेस पक्षांत आहे. परंतु आतापर्यंत वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली नाही. तरी सांगली,भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत असल्यास नाशिक लोकसभेची जागा देखील मैत्रीपूर्ण पद्धतीने लढवावी.त्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिक लोकसभेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

हा मतदारसंघ नाशिक,निफाड,येवला ,चांदवड,सिन्नर ,अकोला एवढा मोठा मतदारसंघ असतांना सुद्धा या मतदारसंघात कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला.गेल्या चार टर्म पासून हा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन नाशिक शहरांत चार आमदार व सिन्नर,इगतपुरी त्रंबक मिळून सहा विधानसभा मिळून नाशिक लोकसभा मतदारसंघ तयार झाला.नाशिक लोकसभा मतदार संघात कडवी झुंज देण्याची क्षमता असलेले उमेद्वार कॉंग्रेस पक्षांत आहे. परंतु आतापर्यंत वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली नाही. तरी सांगली,भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत असल्यास नाशिक लोकसभेची जागा देखील मैत्रीपूर्ण पद्धतीने लढवावी.त्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिक लोकसभेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

10 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

10 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

11 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

12 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

13 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

14 hours ago