राजकीय

देगलूरचा आमदार कोण? मतदारांचा कौल काँग्रेस की भाजपला, उद्या मतमोजणी

टीम लय भारी

नांदेड: काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीच्या निकालाची उत्कंठा वाढलीय. देगलूर बिलोलीत नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण प्रचारासाठी तळ ठोकून होते. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती(Deglur Biloli by-election has increased the curiosity)

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी देखील उमेदवार दिला होता. काँग्रेसनं जितेश अंतापूरकर, भाजपनं सुभाष साबणे आणि वंचित डॉ. उत्तम इंगोले यांना उमदेवारी दिलीय. मतदारांनी नेमका कौल कुणाला दिलाय हे उद्या स्पष्ट होणार आहे.

भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील; असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल

उद्या निकाल

देगलूर बिलोली पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणं उद्या निकाल जाहीर केला जाणार असून उद्या मतमोजणी होणार आहे.

काँग्रेस आणि भाजपकडून प्रतिष्ठा पणाला

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसची जागा खेचून आणल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. भाजपनं पंढरपूरची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यानं देगलूर बिलोलीची निवडणूक लढवली. शिवसेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना त्यांनी पक्षात स्थान देऊन उमेदवारी देण्यात आली. अशोक चव्हाण यांनी पंढरपूरच्या निकालातून धडा घेत, गेला महिनाभर देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकत जितेश अंतापूरकर यांच्या विजयासाठी प्रचारसभांचा धडाका लावला. देगलूर बिलोलीमध्ये आता कोण विजयी होणार हे पाहावं लागणार आहे.

धक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू

Bypolls 2021: Bengal and Karnataka record over 70% turnout; Bihar sees lowest

निकाल कुठे पाहायला मिळणार?

देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होत आहे. पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची प्रत्येक अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर वाचायला मिळणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल उपलब्ध करुन दिला जाईल.

वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार प्रचार

देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप या दोन पक्षांत प्रमुख लढत होत असल्याचं चित्र सुरुवातील दिसून आलं. मात्र, वंचित बुहजन आघाडीकडून डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी देण्यात आली. इंगोले यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे वंचित आघाडीदेखील स्पर्धेत आली आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चांगलीच ताकद लावली होती.

राज्याच्या राजकारणावर परिणाम

पंढरपूर प्रमाणं देगलूर बिलोलीची पोटनिवडणूक काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे चर्चेत राहिली. या निवडणुकीचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे.

Mruga Vartak

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

5 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

5 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

6 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

7 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

7 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

9 hours ago