राजकीय

अजित पवार यांना मंत्रालयातील 602 नंबरच्या केबिनचे भय

एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर, शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित असताना एका कार्यकर्त्याला ‘ए, तू खाली बस की’ अशी तंबी देऊन खाली बसवणारे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात दरारा असणारे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या हाताच्या बोटावर नाचवणारे ‘दादा मंत्री’ म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. 2 जून रोजी शरद पवार यांचे जुने जाणते पदाधिकारी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल यांना सोबत घेत त्यांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवला. दुसऱ्यांना चळाचळा घाबरवणारा हा दादा मंत्री मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील 602 नंबरच्या केबिनला घाबरतो हे वाचून आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. होय, अजित पवार या केबिनला घाबरतात. पण या केबिनमध्ये भुताटकी नाही, तरीही ते का घाबरतात?

भाजपने अजित पवार यांना सत्तेत घेऊन आपली सोय पहिली. पण अजित पवार यांचा एकूण अनुभव, त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात जाऊन केलेले बंड, उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ या सगळ्या बाजू पाहता त्यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरची आपल्या जवळची केबिन देण्याचे भाजपचे राज्याचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले. यासाठी फडणवीस यांचे विश्वासू सचिव सिंह, श्रीकर परदेशी यांच्या केबिन दुसरीकडे हलवल्या. आणि त्यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 नंबर केबिन देण्यात आली. मात्र शाहू, फुले,आंबेडकर यांचा वारसा चालवत असल्याच्या बाता मारणाऱ्या अजित पवार यांनी ही केबिन नाकारली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेली 602 नंबरची केबिन अशुभ मानली जाते. या केबिनमधून आतापर्यंत काम करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला बढती मिळालेली नाही, उलट त्याला राजकीय जीवनात बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे, अशी अजित पवारांची समजूत आहे. याच भावनेतून अजित पवार यांनी ही केबिन नाकारल्याची चर्चा आहे. त्याऐवजी अजित पवार यांनी अजित पवार यांनी सहाव्या मजल्यावरील 716, 717, 722 किंवा 723 यापैकी एका केबिनमध्ये बसण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सध्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अजित पवार यांची केबिन तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असणारी 602 नंबरची केबिन अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मंत्रालयातील ही केबिन अशुभ असल्यामुळे संबंधित नेत्यांना लाभत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जाते. यापूर्वी 602 नंबरची केबिन एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर आणि अजित पवार यांना मिळाली होती. यापैकी खडसे यांची गेल्या काही वर्षांतील राजकीय कारकीर्द खडतर ठरली आहे. तर अजित पवार यांनीही राजकीय जीवनात आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही ही केबिन नाकारल्याचे सांगितले जाते. गेल्यावेळी 2019 मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार औटघटकेचे ठरले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार कोणताही धोका पत्कारायला तयार नसल्याची चर्चा रंगली आहे. याच धारणेतून अजित पवार यांनी मंत्रालयातील 602 नंबरची केबिन नाकारल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेली 602 नंबरची केबिन अशुभ मानली जाते. या केबिनमधून आतापर्यंत काम करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला बढती मिळालेली नाही, उलट त्याला राजकीय जीवनात बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे, अशी अजित पवारांची समजूत आहे. याच भावनेतून अजित पवार यांनी ही केबिन नाकारल्याची चर्चा आहे. त्याऐवजी अजित पवार यांनी अजित पवार यांनी सहाव्या मजल्यावरील 716, 717, 722 किंवा 723 यापैकी एका केबिनमध्ये बसण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सध्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अजित पवार यांची केबिन तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे.अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीने चालणारा पक्ष असल्याचे सांगितले जाते. देशात महाराष्ट्राची पुरोगामी राज्य अशी ओळख आहे. त्यामुळेच सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार यांनी 602 क्रमांकाची केबिन नाकारण्याचा किस्सा प्रचंड चर्चेत आहे. यावर आता अजित पवार किंवा त्यांच्या गटातील मंत्री काही स्पष्टीकरण देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे सुद्धा वाचा:

मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक; काँग्रेसचा हल्लाबोल

दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम शरद पवारांनी केलं – सदाभाऊ खोत यांची टीका

अजित पवार यांना मंत्रालयात मुख्य इमारतीत सहाव्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. या दालनाचे नूतनीकरण होईपर्यंत अजित पवार यांना विस्तारित इमारतीत पाचव्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे. तर इतर मंत्र्यांची दालन आणि शासकीय निवासस्थानाची शोधाशोध सुरू आहे. अजित पवार ‘देवगिरी’ हे आपले शासकीय निवासस्थान कायम ठेवणार आहेत. तर काही मंत्र्यांनी मंत्रालयातील विशिष्ट दालन आणि निवासस्थान मिळावे म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

 

विवेक कांबळे

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

5 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

21 mins ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

13 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

17 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

17 hours ago