Categories: राजकीय

कदाचित दहा वर्षानंतरही भावनिक होऊ; राष्ट्रवादीसोबतच्या मैत्रीबाबत फडणवीस बोलले

शिवसेनेसोबत आपली भाजपची भावनिक युती आहे. एका विचाराने एकत्र आलो आहोत. तर, राष्ट्रवादीसोबत आम्ही पॉलिटिकल मैत्री केली आहे. ही राजकीय मैत्री कदाचित दहा वर्षांनी ती सुद्धा भावनिक युती होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. संपर्क ते समर्थन अभियान यशस्वी होवून एक वर्षाच्या सत्ता काळात नवा सहकारी पक्षाला मिळाला. कार्यकर्त्यांना मध्ये आनंद व उत्साह आहे. भाजपचा प्रवास विरोधातून सुरू होवून उपहासाकडून सर्वामान्यतेकडे गेला. जगात सर्वात मोठा पक्ष ही ओळख निर्माण झाली असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. भिवंडीत भाजपच्या ‘महाविजय 2024’ या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीतील नवा पक्ष राष्ट्रवादीबाबतही सूचक वक्तव्य केले. तर, उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. हा खंजीर भाजपाच्या पाठीत होता. उत्तमराव ते गोपीनाथ राव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते राबले त्यांच्या पाठीत होता. अपमान सहन करू बेइमानी नाही.असंख्य कार्यकर्त्यांच्या बेइमानी होती. हा धर्म आहे अधर्म आहे. कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्या शिवाय त्याला मारता येणार नाही. कृष्णाने काय काय केलं. भीष्माला हल्ला करण्यासाठी शिखंडीला समोर आणलं. अश्वथामाबाबतही ‘नरो वा कुंजरोहा’ ही भूमिका घ्यावी लागली. ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीती करावी लागते, असेही फडणवीस यांनी म्हटले. दोन दोन पक्ष फोडले घर फोडले असा आरोप होतो. जनाधराचा अपमान कोणी केला असा प्रश्न करताना ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येईल असे वक्तव्य ही त्यांनी केले.
काश्मीरमध्ये मेहबूबा सोबत सरकार बनवून त्या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. वेळ आल्यावर सत्तेला लाथ मारून बाहेर पडत तेथील 370 कलम हटवून दाखवलं. ध्येय संपलं नाही पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याचे आहे. हे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पावसाळी अधिवेशनासाठी विधिमंडळाची रंगरंगोटीची कामे जोरात

उरल्या-सुरल्या शेकापचा बुरूज ढासळू लागला; माजी आमदार विवेक पाटील यांचा राजीनामा

टोमॅटोचे दर पडले तेव्हा केंद्र सरकारने नाफेडतर्फे का खरेदी केली नाही; शेतकरी नेत्यांमध्ये संताप  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. काही लोक शपथा खोट्या घेतात. मला खात्री आहे, त्यांनी नक्की म्हटले असेल राजकारणासाठी अशी खोटी शपथ घ्यावी लागते. त्यांनी मनोमन पोहरादेवीची माफी मागितली असेल आणि पोहरादेवी त्यांना माफ करो असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला. 2019 ला कोण मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरले होते आणि हा निर्णय सर्वांशी बोलून झाला होता. पण त्यांनी खंजीर खुपसला. याला बेइमानीच म्हणावी लागेल. दुसरा शब्द नाही असे फडणवीस यांनी म्हटले. पण, हा दगा, हा खंजीर उत्तमरावांपासून गोपीनाथजींपर्यंतच्या पाठित खुपसला गेला. सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीत हा वार होता. असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणाशी, त्यागाशी झालेली ती दगाबाजी होती. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी गाळलेल्या घामाशी ती गद्दारी होती असे फडणवीस यांनी म्हटले. हम छेडते नही…छेडा तो छोडते नही…दगाबाज्यांना माफी नाहीच… हा आमच्यावर शिवरायांचा संस्कार असल्याचेही सांगत फडणवीसांनी सूचक इशाराही दिला.

विवेक कांबळे

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

31 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

47 mins ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

14 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

17 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

17 hours ago