राजकीय

धनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय!

टीम लय भारी

मुंबई :- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची उसतोड कामगारांसाठीची (Sugarcane workers) लढाई धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार (Sugarcane workers) कल्याण महामंडाळांतर्गत ऊसतोड कामगारांच्या (Sugarcane workers) मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. धनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे (Dhananjay Munde has made a big decision for the future of the children of sugarcane workers).

यानुसार निवडक 10 तालुक्यात 20 वसतिगृह उभारणे (प्रत्येकी 100 क्षमतेचे मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक), आवश्यक पदभरती, इमारत उपलब्धी इत्यादी बाबींना मंजुरी देण्यात आली आहे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

शिवसेना-भाजप ‘राड्या’वर चंद्रकांत पाटलांचे चोख प्रत्युत्तर

संजय राऊतांचा राज्यपाल कोश्यारींना टोमणा; ट्विटवरून केली टीका

Ramdev booked in Chhattisgarh for allegedly spreading false information about Covid-19 medicines

2 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 15 दिवसाच्या आत या योजनेला कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलल्याचा मनस्वी आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली.

कोणत्या जिल्ह्यात किती वसतिगृह?

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील पाटोदा, केज, बीड, गेवराई, माजलगाव, परळी या सहा तालुक्यात प्रत्येकी दोन प्रमाणे 12 वसतिगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी दोन प्रमाणे 4 आणि जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यात प्रत्येकी 2 प्रमाणे 4 असे एकूण 20 वसतिगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुविधा काय

या प्रत्येक वसतिगृहाची प्रवेश क्षमता 100 असणार आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी संबंधित तालुक्यातील ऊसतोड कामगारांची (Sugarcane workers) इयत्ता 5 ते पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणारी मुले-मुली पात्र राहणार आहेत.

या वसतिगृहांचे व्यवस्थापन आणि नियमावली सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाप्रमाणेच असणार आहे. वसतिगृहाचे स्वतःच्या जागेत बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे वसतिगृह भाड्याच्या जागेत उभारण्याची मान्यता देण्यात आली आहे. तसेच वसतिगृहांचे बांधकाम आणि अन्य आवश्यक सामृग्रीसाठी आवश्यक निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या वसतिगृहाचे व्यवस्थापन करण्यासाठी गृहपाल, कनिष्ठ लिपिक, सफाई कामगार, चौकीदार, शिपाई अशी आवश्यक पदे शासन नियमाप्रमाणे भरण्यात येणार आहेत. तसेच या वसतिगृहांचा संपूर्ण खर्च ऊस खरेदीवरील प्रतिटन 10 रुपये अधिभार आणि त्याबरोबरीने राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी, यातंर्गत उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

धनंजय मुंडेंचे अभिनंदन

गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगारांचे कल्याणकारी महामंडळ आणि त्यांच्या नावाने विविध योजनांची केवळ घोषणा केली जात होती. परंतु त्यांच्या भावनांचा केवळ राजकीय वापर होत होता. पण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मात्र ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना अत्यंत कमी कालावधीत अस्तित्वात आणल्याने ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांच्या विविध संघटनांकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

32 mins ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

1 hour ago

संध्याकाळी व्यायाम करणे योग्य की नाही? जाणून घ्या

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष्य द्याचा वेळ सुद्धा…

2 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jaykumar Gore's neighbor…

2 hours ago

जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्याची संपादक तुषार खरात यांना धमकी

आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण - खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत…

3 hours ago

झोपण्यापूर्वी दुधामध्ये मिसळून प्या ‘या’ सुक्या लाकडाची पावडर, त्वचेवर येईल चमक

निरोगी त्वचेसाठी लोक अनेक उपाय करतात. स्त्री असो की पुरुष सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी…

3 hours ago