Categories: राजकीय

धनगर समाजाचा प्रभाकर देशमुख यांना पाठींबा

लय भारी न्यूज नेटवर्क

म्हसवड : माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना जाहीर पाठींबा देण्याची भूमिका माण – खटावमधील धनगर समाजाने घेतली आहे. माण – खटाव मतदारसंघात धनगर समाजाचे जवळपास 80 हजार मतदान आहे. धनगर समाजाची मोठी व्होट बँक प्रभाकर देशमुख यांच्या पाठीमागे उभी राहिल्याने माण – खटावमधील निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलेल असे बोलले जात आहे.

प्रभाकर देशमुख यांच्याविषयी विरोधकांनी अपप्रचार सुरू केला होता. देशमुख यांना केवळ मराठा समाजाचाच पाठींबा असल्याचा अपप्रचार सुरू होता. परंतु धनगर समाजाने जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपातील हवा निघेल, अशी भावना धनगर समाजातील नेत्यांनी व्यक्त केली आहे.

धनगर समाजाबरोबरच वंजारी, दलित, माळी, रामोशी, कैकाडी अशा अठरापगड जातीच्या नेत्यांसोबत देशमुख यांनी संवाद साधला आहे. एवढेच नव्हे तर या समाजाचा विकास व्हावा. त्यांच्या पुढच्या पिढीची प्रगती व्हावी. त्यांची पारंपरिक व्यावसायवृद्धी व्हावी यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे देशमुख यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

म्हसवड येथे आज होत असलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये प्रभाकर देशमुख यांच्यासह प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

धनगर समाजातील प्रश्न, त्यांच्या मागण्या, धनगर समाजाची संस्कृती याचा विकास करण्याबाबत आजच्या मेळाव्यामध्ये चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

प्रभाकर देशमुख यांना धनगर समाजातील 50 पेक्षा जास्त नेत्यांनी पाठींबा दर्शविला आहे. यांत बबन विरकर, मामूशेठ विरकर, युवराज बनगर, अशोक माने, विक्रम शिंगाडे, जालिंदर खरात, नानासाहेब दोलतडे, बाळासाहेब काळे, दादासाहेब शिंगाडे, देविदास म्हासाळ, दादा मडके, सचिन व्हनमाने, बाबाराजे हुलगे, दादासाहेब दोरगे, मारूती मोठे, विराज गोरड, भास्कर काळे, सुभाष घुटुगडे, अंकुश गारळे, बाळासाहेब मदने, महादेव म्हासाळ, रामचंद्र झिमल, संजय दिडवाघ, बाबासाहेब माने, बापू बनगर, भारत अनुसे आदी नेत्यांचा समावेश आहे.

धनगर समाजातील विविध मान्यवर नेत्यांनी त्या अनुषंगाने आज सायंकाळी म्हसवड येथे धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजनही केले आहे.

भाजप – शिवसेना धनगरांसाठी घातक

धनगरांना आरक्षण देतो म्हणून भाजपने मते घेतली. पण आरक्षण दिलेच नाही. दुसऱ्या बाजूला भाजपने अण्णा डांगे, अनिल गोेटे, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर या धनगर नेत्यांना संपविले. रमेश शेंडगे, गणेश हाके अशा नेत्यांना खड्यासारखे बाजूला ठेवले आहे. शिवसेनेने तर विद्यमान धनगर आमदार नारायण पाटील यांना तिकिटच दिले नाही. त्यामुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांविरोधात धनगर समाजात रोष पसरला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तुषार खरात

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

10 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

11 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

13 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

13 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

14 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

14 hours ago