राजकीय

गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर नेतेही संतापले

टीम लय भारी

मुंबई : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अगोदरच हात वर केले होते. आता धनगर समाजातील नेत्यांनीही आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आसूड ओढले आहेत ( Dhangar leaders slams to Gopichand Padalkar ).

राज्यमंत्री दत्ता भरणे, माजी आमदार हरिदास भदे, उत्तम जानकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानजी देवकाते या नेत्यांनी पडळकर यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

‘पडळकर यांनी मिळालेल्या आमदारकीच्या समाजाच्या कल्याणासाठी वापर करायला हवा. परंतु ते वादग्रस्त विधाने करीत आहेत. त्यामुळे धनगर समाजाचे नुकसान होईल अशी भीतीच या नेत्यांनी व्यक्त केली आहे ( Gopichand Padalkar’s controversial statements will be harm to Dhangar community).

नरेंद्र मोदी दगाबाज, फडणवीस भामटे असे आम्ही म्हणणार नाही

उत्तम जानकर यांनी तर पडळकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन भाजपवरच तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण देतो म्हणाले होते, फडणवीस यांनी तर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षण मंजूर करू असे बोलले होते. तरीही आम्ही मोदी व फडणवीस यांना दगलबाज व भामटे असे म्हणणार नाही, अशा शब्दांत जानकर यांनी टोला लगावला.

धनगर आरक्षणाचा विषय हा केंद्राच्या आखत्यारितील आहे. केंद्रात गोपीचंद पडळकर यांच्या पक्षाचेच सरकार आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाला संसदेतून मान्यता मिळवावी. महाराष्ट्रात पंधरा दिवसांत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मी घेतो असे आव्हानही जानकर यांनी दिले ( Uttam Jankar given challenge to Gopichand Padalkar ).

गोपीचंद पडळकर हे अल्पवयीन बालिश बुद्धीचे नेते आहेत. अशा पद्धतीने ते आरक्षणाचा प्रश्न सोडवायला गेले तर पुढची २५ वर्षे वाट पाहावी लागेल असेही जानकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर धनगर तरूणांची माथी भडकविण्याचे उद्योग करीत आहेत

सक्षणा सलगर म्हणाल्या की, गोपीचंद पडळकर हे माझ्या समाजातील असल्यामुळे मला त्यांच्या विषयी आदर होता. पण गेल्या वर्षभरात त्यांनी केलेले मर्कटउद्योगांमुळे ते धनगर समाजासाठी घातक असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. हिमालयासारखी उंची असलेल्या शरद पवारांवर ते टीका करतात हे योग्य नाही.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पडळकर यांनी लाखोंचे मेळावे राज्यभरात घेतले होते. त्यात त्यांनी भाजप, मोदी व फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. फडणवीस यांच्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. फडणवीस यांनी धनगर समाजाला फसविले आहे. त्यामुळे भाजपला मतदार करू नका असे सांगण्यासाठी पडळकर यांनी मोठ्या सभा गाजवल्या होत्या ( Gopichand Padalkar was made anti BJP campaign). त्यानंतर अवघ्या वर्षातच ते भाजपच्याच तंबूत दाखल झाल्याकडे सलगर यांनी लक्ष वेधले.

पडळकर यांना राजकारणात पुढे जायचे आहे म्हणून ते  धनगर समाजाचा वापर करीत आहेत. ते धनगर तरूणांची माथी भडकावत. पडळकरांची प्रक्षोभक विधाने ऐकून धनगर तरूण आक्रमक होतात. त्यातून या तरूणांवर पोलिसांत गुन्हे दाखल होतात. पण नंतर या तरूणांना सोडविण्यासाठी मदत करीत नाहीत. त्यामुळे धनगर समाजातील तरूणांनी पडळकरांच्या विधानांना फशी पडू नये असे आवाहनही सलगर यांनी केले ( Sakshana Salgar appealed to Dhangars, avoid Gopichand Padalkar).

गोपीचंद पडळकर हे मनुवादी भाजपचे बाहुले

शरद पवार हे बहुजन व धनगर विरोधी आहेत असे गोपीचंद पडळकर म्हणतात. परंतु भाजपचा पूर्ण इतिहास व धोरणच बहुजन व धनगर विरोधी आहे. भाजप हा मनुवादी विचारसरणीचा पक्ष आहे. उलट पवार हे शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारसरणीचे आहेत. पण केवळ लाचार मनोवृत्तीतून गोपीचंद पडळकर पवारांवर आरोप करीत आहेत असे माजी आमदार हरिभाऊ भदे म्हणाले.

पवार यांच्या विरोधात पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजपच्या नेत्यांनाही समर्थन केलेले नाही. उलट पडळकर चुकल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. चूक झालेली असल्याने पडळकरांनी पवारांची माफी मागितली पाहीजे ( Haridas Bhade scathing to Gopichand Padalkar).

खरेतर, वर्षभरापूर्वी पडळकर यांनी भाजपच्या विरोधात धनगर समाजाला पेटविले होते. लाखोच्या सभा घेऊन ते धनगर समाजासमोर भाजपविरोधी भाषणे झाडत होते. राजकारणांमध्ये देव व आई – वडिलांना कधी आणू नये. पण तो ही विधीनिषेध न ठेवता पडळकर यांनी लोकांना बिरोबाची शपथ दिली.

माझे आई वडिल जरी भाजपमधून निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना मते देऊ नका. त्यासाठी त्यांनी लोकांना बिरोबाची शपथ घातली. पण त्यानंतर अशी काय जादू झाली की, अवघ्या दहा महिन्यांतच गोपीचंद पडळकर भाजपमध्ये दाखल झाले, असा सवाल भदे यांनी केला आहे.

पडळकरांमुळे धनगर समाजाचे नुकसान

राजकारणात सभ्य शब्दांचा वापर केला पाहीजे. पण त्याचे भान न ठेवता गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. पडळकरांचा एकूणच प्रवास पाहिला तर, आपल्या राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाला ते नेहमी पुढे करीत आले आहेत. त्यांच्या या प्रकारांमुळे धनगर समाजाचे नुकसान होईल अशी टीका नानजी देवकाते यांनी केली आहे.

पडळकरांनी बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळीच पवार साहेबांची उंची किती मोठी आहे हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. मोठ्या व्यक्तीवर अशी विधाने करताना पडळकरांनी दहा वेळा विचार करायला हवा. मुळातच भाजपने धनगर समाजाला फसविलेले आहे. त्याबद्दल धनगर समाजाच्या मनात आजही संताप आहे. असे असताना पडळकर दिशाभूल करणारी विधाने करून पवारांवर आरोप करीत आहेत.

धनगर समाजाला सध्या एनटीचे आरक्षण लागू आहे. हे आरक्षण शरद पवार यांच्यामुळेच मिळाले आहे. या आरक्षणानंतर धनगर समाजाची शिक्षणामध्ये प्रगती झाली. सरकारी नोकऱ्यांमध्ये फार मोठा टक्का वाढला. या उलट फडणवीस यांनी एसटी आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाला फसविले आहे. त्यामुळे पडळकर राग व्यक्त करायचाच असेल तर तो फडणवीसांवर व्यक्त करावा असे देवकाते म्हणाले.

पडळकर, जानकरांबद्दल काहीच न बोललेले बरे

गोपीचंद पडळकर व महादेव जानकर हे कधी कोणती विधाने करतील सांगता येत नाही. वादग्रस्त विधाने करतात आणि स्वतःलाच अडचणीत आणतात. त्यामुळे मला अशा लोकांबद्दल काहीच बोलायचे नाही अशा भावना अण्णा डांगे यांनी व्यक्त केल्या.

माजी आमदार अनिल गोटे यांनी सुद्धा गोपीचंद पडळकरांविषयी काहीच न बोलले बरे अशी भावना व्यक्त केली. पडळकर यांनी शरद पवारांची ‘कोरोना’ म्हणून संभावना केली, पण देवेंद्र फडणवीस हे तर महारोगी आहेत. फडणवीसांनी धनगरांना कसे फसविले आहे हे राज्यातील सगळ्या धनगरांना माहित आहे. त्यामुळे फडणवीसांच्या ‘रोगा’वरही बोलायला हवे असा सवाल त्यांनी केला.

तुषार खरात

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

3 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

3 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

4 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

4 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

5 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

7 hours ago