राजकीय

डॉ.जितेंद्र आव्हाडांनी अंधभक्तांना दिलं टॉनिक

जितेंद्र आव्हाडांनी अंधभक्तांवर मोठे उपकार केले आहेत(Dr. Jitendra Awhad Accidently tore Dr. Babasaheb Ambedkar’s Photo While Burning Manusmriti). लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडलेले आहे. सगळे अंधभक्त हताश व निराश झालेले आहेत. सोशल मीडियावर त्यांना नीट थयथयाट करता येईनासा झालाय. महाराष्ट्रात भाजपची पुरती वाट लागण्याची चिन्हं दिसत आहेत. भारतभरात सुद्धा हेच चित्र दिसतंय. एकनाथ शिंदे व अजित पवार यांची गद्दारी सामान्य लोकांना आवडलेली नाही. नरेंद्र मोदींचा श्रीराम मंदिराचा मुद्दा लोकांना भावलेला नाही. पण लोकांमध्ये संविधान वाचविण्याची तळमळ दिसून येत आहे. राहूल गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर सदानकदा Whats App युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञ असलेले अंधभक्त लाथाळ्या झाडत असतात. पण मतदारांना मात्र नेमके हेच तीन नेते भावलेले आहेत. अर्थात अंधभक्तांना हे पटणार नाही. सोशल मीडियातील चिखलात डुकरासारखं पडून राहायचं, आणि गाढवासारख्या लाथाळ्या झाडायच्या असं या अंधभक्त तज्ज्ञांचं अहोरात्र काम सुरू असतंय. पण निवडणुकीनंतर अंधभक्ताच्या या कामाला ब्रेक लागलाय. कारण नरेंद्र मोदींची नय्या ४०० पार होताना दिसत नाही. गोदी मीडियाने भाजप व एनडीएला मिळणाऱ्या जागांची आकडेवारी दाखवायला सुरूवात केलीय. भाजप बहुमताचाही आकडा पार करणार नाही. एनडीएच्या मदतीने भाजपला सत्ता स्थापन करावी लागेल, असे आकडे सांगत आहेत. एकापेक्षा जास्त पक्षांना एकत्र येवून सरकार स्थापन करावं लागलं तर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदावर गंडांतर येवू शकतं. कारण एनडीएचे घटक पक्ष नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावर नको, अशी अट ठेवू शकतात. नितीन गडकरी हा सर्वमान्य चेहरा आहे. नितीन गडकरींच्या नावावर एकमत होवू शकतं. असं झालं तर अंधभक्तांचे नेते नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. अन् काय सांगावं इंडिया आघाडी सुद्धा सत्तेत येवू शकते. ही चिंता अंधभक्तांना लागून राहिलेले आहे. अनेक अंधभक्तांना तर अन्न सुद्धा गोड लागेनासं झालं आहे. अंधभक्तांचं डोकं सुन्न होवून गेलंय. सोशल मीडियावर व्यक्त कसं व्हायचं हेच अंधभक्ताना सुचेनासं झालंय. अशा या परिस्थितीत अंधभक्तांच्या मदतीला जितेंद्र आव्हाड धावून आले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चुकून म्हणा किंवा अनवधनाने म्हणा, किंवा निष्काळजीपणे म्हणा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र असलेलं मनुस्मृतीचं पोस्टर फाडलं गेलं. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. पण शेवटी चूक ती चूकच. जितेंद्र आव्हाड हे आक्रमक नेते आहेत. विरोधी पक्षातील बहुतांश नेते भाजपच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या कार्यकर्त्यांसमोर अक्षरशः लोटांगण घालत आहेत. विरोधी पक्षातील संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांसारखे मोजकेच नेते भाजपला घाम फोडत आहेत. हे तिघेजण अंधभक्तांच्या झूंडीला खेळवत आहेत. भाजपच्या बोगसगिरीवर आसूड ओढण्याचं चांगलं काम जितेंद्र आव्हाड करीत असतात. पण बऱ्याचदा घाईच्या नादात, नियोजनाच्या अभावामुळे त्यांच्याकडून अनवधानाने चाबकाचा एखादा फटकारा स्वतःवरच बसतो. मनुस्मृतीचे दहन करण्याचं चांगलं काम त्यांनी हाती घेतलं होतं. जी मनुस्मृती जाती पातीला उत्तेजन देते, महिलांना दुय्यम स्थान देते, अशा मनुस्मृतीला जाळलेच पाहीजे. हा खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच विचार आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी कुणाचे काहीही मत असू शकते. पण डॉ. आव्हाड हे कट्टर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे नेते आहेत, हे कुणीही मान्य करेल. डॉ. बाबासाहेबांचे वारसदार असलेले प्रकाश आंबेडकर प्रत्यक्षात मनुस्मृतीच्या समर्थकांना मदत होईल, असे राजकारण करतात. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असलेले रामदास आठवले मनुस्मृतीच्या समर्थकांसोबत सरकारमध्ये सामील झालेले आहेत. असे असताना डॉ. जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेबांचा विचार हाती घेवून संघर्ष करीत आहेत. मनुस्मृतीविरोधात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जे आंदोलन केलं, त्या मागचा हेतू एवढाच होता की, डॉ. बाबासाहेबांचं संविधान टिकलं पाहीजे. भारतीय शिक्षण व्यवस्था ही डॉ. बाबासाहेबांच्या विचारधारेवर पुढे गेली पाहीजे. शिक्षणव्यवस्थेत मनुस्मृतीला स्थान असता कामा नये, हाच विचार घेवून डॉ. आव्हाड आंदोलन करीत होते. त्यावेळी चुकून त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेबांचं छायाचित्र असलेलं एक पोस्टर फाडलं गेलं. पोस्टर चुकून फाटलं तरी आव्हाड यांच्या हृदयावर कोरलेले बाबासाहेबांचे विचार कधी पुसून जातील असे वाटत नाही.पण या सगळ्या प्रकारामुळे अंधभक्तांना मात्र नवचेतना मिळाली. डॉ. बाबासाहेबांचे विचार या अंधभक्तांना नको असतात. त्यांना मनुस्मृती हवीय, पण बाबासाहेब नकोत. हा अंधभक्तांच्या हृदयात लपलेला खरा विचार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

31 mins ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

2 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

2 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

3 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

4 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

4 hours ago