राजकीय

एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी संताजी घोरपडेंच्या समाधीचं दर्शन घ्यावं, त्यांना प्रेरणा मिळेल !

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल कालच जाहीर झाला.महाराष्ट्रात मविआला जनतेने स्वीकारलेले आहे असे एकंदरीत दिसत आहेत.एनडीएला १७ जागा मिळालेल्या आहेत तर मविआला ३५ जागा महाराष्ट्रात मिळालेल्या आहेत(Eknath Shinde, Ajit Pawar should visit Santaji Ghorpade’s mausoleum, they will get inspiration).एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महाराष्ट्रातील जनतेने चांगलाच धडा शिकवला असे आपण म्हणू शकतो.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काही कालावधीतच महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देश भर गद्दार, खोकेबहाद्दर अशा अनेक उपाद्या दिल्या परंतु निर्ल्लज सदासुखी ह्या म्हणी प्रमाणे त्यांचा कारभार सुरूच होता.
एकनाथ शिंदेंचे ७ उम्मेदवार निवडूण आले असले तरी उध्दव ठाकरे यांच्या निवडूण आलेल्या उम्मेदवारांची संख्या जास्त आहे. आणि असच काही अजित पवार यांना अवघी १ जागा मिळाली आहे.त्यात आजच देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.जनतेने तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धडा शिकवला.हे दोघेही शिवाजी महाराजांचा इतिहास विसरलेले दिसतात.ह्या दोघांनी संताजी घोरपडे यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला पाहिजे.ही समाधी निष्ठा आणि गद्दारीचं प्रतिक आहे.मराठा साम्राज्यातील गद्दार सरदार नागोजी माने याने याच ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारलं होतं. संताजी घोरपडे हे आयुष्यभर स्वराज्यासोबत एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही गद्दारी केली नाही. उलट नागोजी माने हे कधी मराठ्यांसोबत तर कधी औरंगजेबासोबत राहिले.
सदर इतिहासाचा अभ्यास आणि स्वत:चे आत्म परीक्षण करायची गरज एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आहे असे आता जनतेला वाटू लागले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

47 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago