राजकीय

Gundaraj : मुंबईत गुंडाराज, मुख्यमंत्री अकार्यक्षम! कंगनाचा ‘ट्विट’द्वारे हल्ला

टीम लय भारी

मुंबई : मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (Gundaraj in Mumbai, Chief Minister incompetent!)  (Kangana’s attack via ‘tweet’) मुंबईत गुंडाराज (Gundaraj) चालू असल्याचा आरोप करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत टीका केली आहे. साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं असून, काँग्रेसला सवाल केला आहे.

हरयाणातील यू-ट्यूबर साहित चौधरी यानं महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात साहिल चौधरीला अटक करण्यात आल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘मुंबईत हे काय गुंडाराज सुरू आहे. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यंत्र्यांना व त्यांच्या टीमला कुणीही प्रश्न विचार नाहीये. त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आमचं घर तोडलं आणि आम्हाला मारलं? याला उत्तरदायी कोण आहे, असा प्रश्न कंगनानं काँग्रेसला विचारला आहे.

‘साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तत्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्तकाराचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे,’ असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

10 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

11 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

12 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

12 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

12 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

14 hours ago