राजकीय

हिंदुत्ववाद्यांच्या मैदानात राहुल गांधींनी केले नरेंद्र मोदींना चीतपट!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले सुरेश चव्हाणके यांनी पंतप्रधान पदासाठी लोकांचे मत अजमावण्यासाठी ट्विटरवर एक जनमत चाचणी घेतली. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान पदासाठी चार पर्याय लोकांसमोर ठेवले होते. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असे चार पर्याय होते. @narendramodi@RahulGandhi@NitishKumar@ArvindKejriwal#PollForPM असे या जनमत चाचणीअंतर्गत प्रधानमंत्री के रूप मी २०२४ के लिए आपकी पसंद कौन है? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामध्ये लोकांनी सर्वाधिक पसंती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चव्हाणके यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे. (In the field of Hindutva, Rahul Gandhi beat Narendra Modi!)

पंतप्रधान म्हणून २०२४ मध्ये तुम्ही कोणाला पसंती द्याल? असा सवाल लोकांना याद्वारे विचारण्यात आला आहे. ५४ टक्के लोकांनी २०२४ मध्ये राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान झालेले पाहायला आवडेल, असे मत व्यक्त केले आहे. ‘भारत जोडो” यात्रेनंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली असल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी हे दुसऱ्या स्थानावर फेकले गेले असून त्यांना ४१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. नितीश कुमार यांना केवळ ३ टक्के तर नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांनादेखील फक्त ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. खुद्द हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावरच मोदींना लोकांनी झिडकारले आहे. यावर लोकांनी उपरोधिक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

कोण आहेत सुरेश चव्हाणके?
सुरेश चव्हाणके हे पत्रकार आहेत. ‘सुदर्शन न्यूज’चे ते मुख्य संपादक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘तरुण भारत’ या दैनिकात त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले आहे. पूर्णवेळ पत्रकारिता करण्याआधी’आरएसएस’मध्ये त्यांनी कित्येक पदांवर काम केले आहे.

मोहम्मद उस्मान यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रया पाहा : 

सोनू चौधरी म्हणतात..

सलीम सारंग म्हणतात… स्वतःच्याच धनुष्य बाणाने चव्हाणके यांनी स्वतःलाच घायाळ केले…

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago