राजकीय

Mahatma Gandhi | Aundh | ग. दी. माडगूळकर, साने गुरूजी, शंकरराव खरात, किर्लोस्कर यांना घडविणारी शाळा

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले(India got independence on 15 August 1947). म्हणून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. परंतु भारतात असाही एक मोठा भाग आहे की, तिथे देशाच्याही अगोदर म्हणजे १९३९ मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. एवढेच नव्हे तर त्यावेळी तिथे ग्रामपंचायत सुद्धा स्थापन करण्यात आली होती.

Breaking : पोलिसांच्या बदल्यांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

स्वातंत्र्य मिळालेल्या या स्वतंत्र संस्थानासाठी महात्मा गांधी यांनी संविधान लिहिले होते. भारतात लिहिले गेलेले हे पहिले संविधान होते. ही कहाणी आहे, औंध संस्थानाची. त्यावेळचे महाराज बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या संस्थानाला स्वातंत्र्य दिले होते. युवराज आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे संस्थानचे राजदूत होते. त्यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये संस्थानचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे लोकशाही, साम्यवादी, समाजवादी अशा विविध विचारसरणींचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे संस्थानाला स्वातंत्र्य द्यायचे आणि लोकशाही स्थापन करायची,

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्यद‍िनाची तारीख 15 ऑगस्ट ठरवण्याचे कारण

अशी मानसिकता आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांची झाली होती. त्यांच्या या विचारातूनच त्यांचे वडिला बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी औंध संस्थानाला प्रतिनिधीत्व देवून टाकली. ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थानला भेट दिली. औंध संस्थानातील अनेकविध प्रकारची माहिती त्यांनी जाणून घेतली. या ठिकाणचे रहिवाशी व निवृत्त शिक्षक जयवंत खराडे यांनी संस्थानचा इतिहास उलगडून दाखवला. विशेष म्हणजे, हे स्वातंत्र्य देताना लोकशाही पद्धतीने स्वातंत्र्य देण्यात आले होते. महात्मा गांधींनी जी ग्रामस्वराज्य ही संकल्पना मांडली होती, त्या संकल्पनेनुसार संस्थानचा कारभार सुरू करण्यात आल्याचे जयवंत खराडे यांनी यावेळी सांगितले.

तुषार खरात

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago