राजकीय

नेहरूंचें महान कार्य हीच संघ-भाजपची पोटदुखी

नथुराम गोडसे या कट्टरवादीहिंदू राजकीय विचारसरणीच्या उजव्या प्रतिगामी अतिरेक्याने महात्मा गांधींना ३०जानेवारीला १९४८ रोजी गोळ्या घातल्या (India’s first Prime Minister Jawaharlal Nehru’s Great Work) . ज्यामध्ये तो महान राष्ट्रपिता देहाने मरणपावला. तेव्हाच देशाची सारी सूत्र पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातात आली.ज्यांच्याकडे जाऊन काही विचारावे, सल्ला घ्यावा इतरांसोबतच्या नातेसंबंधांबाबतचर्चा करावी असा माणूस नेहरूंसह उरला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हे तेव्हादेशातील सर्वोच्च आणि अतिशय मोठे नेते होते. केवळ इतकचं नव्हे, तर जगभर त्यांच्याव्यक्तिमत्वाचा प्रभाव होता, दबदबा होता आणि त्यांच्याविषयी विलक्षण आकर्षण होतं.पंडित नेहरू जेव्हा गांधींनंतरच्या भारताचे एकमेव आणि निर्विवाद नेते झाले. तेव्हाभारताची राज्यघटना बनायची होती. भारतासमोरच्या असंख्य गुंतागूंतीच्या आणि अजस्त्रसमस्या त्यांच्यासमोर आ वासून उभ्या होत्या. २७ मे १९६४ साली नेहरूंचं हृद्यविकाराच्याझटक्याने निधन झाले. त्यांना अभिवादन करत त्याविषयीची ही काही विशेष माहिती जाणूनघेउयात. ‘लय भारी’ ने काही दिवसांपूर्वीच प्रकाशित केलेल्या ‘गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलंय का…” या विशेषांकात ज्येष्ठपत्रकार राजू परूळेकर यांचा ”पंडित नेहरूंचें महान कार्य हीच संघ-भाजपची पोटदुखी,  हा लेख नेहरूंविषयी अनेक विषयावरभाष्य करताना दिसतो. या लेखात ते काय म्हणतात पाहूया …… १९५२ साली पहिली निवडणूकझाली. त्यावेळी नेहरू हे इतके मोठे नेते होते कि, तेव्हा त्यांनी जर ठरवलं असतं तरभारतात बहूपक्षीय लोकशाही येऊ शकली नसती. पुढची शंभर वर्षे त्यांनी ठरवून दिलेलेलोक भारतावर राज्य करीत राहीले असते. स्वत: नेहरूंनी एखाद्या रॉबर्ट बुगाबेप्रमाणे भारतावरराज्य केलं असतं आणि भारत हा २०१२-१३ मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडेवाटचाल करीत होता, त्याऐवजी आफ्रिकेतल्या भूखेकंगाल देशाप्रमाणे एखाद्या क्रूरहूकूमशहाच्या टाचेखाली रगडला गेला असता. भारतीय लोकशाहीचं जे स्वरूप आहे; म्हणजे त्यातली विज्ञाननिष्ठता,त्यातला कल्याणकारी राज्याचा गाभा, लोकशाही आणि प्रत्येक माणसाला असलेला मतदानाचाअधिकार, समता आणि समानता, हिंदू कोडबिलांसारखे क्रांतिकारक विचार हे दोनमाणसांमुळे उभे राहिले, पंडित जवाहरलाल नेहरू आणि ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर. गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही एक अतिरेकी विचारांची संघटना आहेयामताचे पटेल होते. बऱ्याच प्रमाणात लोकशाहीवादी असणाऱ्या नेहरूंनी तसे होऊ दिलेनाही.सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमध्ये पहिला देखणा आणि मोठा पुतळा खुद्दनेहरूंनीचउभा केलेला आहे. हा पुतळा गोध्रा येथे  आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे सरदारवल्लभभाई पटेल हयात असताना नेहरूंनी तो पुतळा उभा केला होता. यासाबंधी भाषणकरताना नेहरू बोलले होते की, “Sardar Patel is a valiant fighter inthe cause offreedom… Having won freedom, he is now engaged in retaining it. He haschangedthe map of India”. आपल्या जवळच्या सहकाऱ्याबद्दल त्याचा पुतळा जीवंतपणे उभा करूनवर उल्लेखिलेले गौरोवोद्गार काढलेल्या नेहरूंना पटेलांविषयी काय प्रतीचा आदर आणि प्रेमवाटत असेल हे पुढे त्याच गोध्र्यामध्ये शतकातले भयानक असे दंगे घडवून आणणाऱ्याअतिरेकी हिंदूत्त्ववाद्यांना कधीच कळलं नाही.कुठच्याही एका लेखात किंवा कुठच्याही एका पुस्तकात मावेल एवढे पंडित जवाहरलालनेहरूंचेकर्तृत्व छोटे नाही. आधुनिक भारताच्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू हेमहात्मागांधींएवढेच मोठे आणि अद्वितीय नेते होऊन गेलेले आहेत. काही बाबतीत तर तेगांधीजींपेक्षाही सरस होते. १९६२ साली चिन बरोबरीच्या युद्धात भारताला जेकाहीअपयशआले त्याचे कारण नेहरूंना १९५२ पासून १९६२ पर्यंत दहा वर्षात अख्याभारताततल्या यंत्रयुगाची निर्मिती करताना सिमांवर अत्याधुनिक यंत्राने सुसज्ज असलेली फौज उभीकरणंअशक्य होतं हेही आहे. आज इतक्या वर्षानंतर लद्दाख, अरूणाचल प्रदेश, हिमाचल,सिक्कीमपर्यंत चिनच्या सेना आतपर्यंत आल्या. त्याचा मुकाबला २०२१ साली भारताचेपंतप्रधान असलेले मोदी काय करताहेत? ते तर चिनचे नाव घ्यायलाही धजत नाहीत. चिनलानेहरू घाबरले नाहीत. पण आपल्याकडे संसाधनचं कमी होती. हिमालय आणि हिमालयाएवढेनेहरू यांचा खरा न्याय भारत आजही करू शकलेला नाही. नेहरूंच्या असण्याने आपण एकजगाला आदर वाटेल असा अर्वाचिन समाज निर्माण झालो. दुर्दैवाने हे लिहित असतानानेहरूंचा द्वेष करणाऱ्या क्षुद्र संघटनांनी हा महान देश परत अंधारयुगातलोटलेला आहे. अशावेळी कदाचित नेहरूंचे स्मरण आपल्याला प्रकाश दाखवेल आणि नेहरूंच्याकर्तृत्वाचा खरा अर्थकाय आहे य़ाचा आपल्याला बोध होईल एवढीच आशा आज आपण बाळगू शकतो. नेहरूंच्या शर्टावर लावलेलं गुलाबाचं फुल हे नेहरूंच्या गुलाबपुष्पावरच्या प्रेमातूनआलेलं असेल. समोरअसलेल्या कॅमेऱ्याच्या प्रेमातून नव्हे.लय भारीच्या ‘’गांधी-नेहरूयांनी देशाचं खरचं नूकसान केलं का ….’’या विशेषांकांत राजू परुळेकर देशातील ४५ पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत. यात शरद पवार, राजदीप सरदेसाई , श्रीराम पवार, राजेंद्र साठे, अतुल भातखळकरआदींचा समावेश आहे..हा विशेषांक खरेदी करण्यासाठी आपण ९८२१२८८६२२ या क्रमांकावरसंपर्क साधू शकता.

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago