Categories: राजकीय

ज्योतिरादित्य शिंदेंनी दाखविला ‘मराठी बाणा’

टीम लय भारी

भोपाळ : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील (कण्हेरखेड) मुळचे असलेले ज्योतिरादित्य शिंदेंचे पूर्वज राणोजी शिंदे हे पेशव्यांच्या काळात ग्वाल्हेरला गेले. त्यांच्या पुढच्या पिढीतील दत्ताजी शिंदे, जायाजी शिंदे व महादजी शिंदे या बंधूंनी आपल्या उत्तुंग पराक्रमाने शिंदे राजघराण्याचा देशात दबदबा तयार केला. याच ‘शिंदे घराण्यातील माझे रक्त आहे’ अशा शब्दांत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी भोपाळमधील भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला टोले लगावले. आपले ‘शिंदे घराण्याचे रक्त’ असल्याचीही आठवण ज्योतिरादित्य यांनी करून दिली.

‘शिंदे घराण्याच्या रक्ताचा’ उल्लेख केल्यामुळे ज्योतिरादित्यांच्या पूर्वजांचा पराक्रम जागा झाला आहे. पेशव्यांच्या काळात रघुनाथ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे आणि होळकरांच्या फौजांनी पाकिस्तानातील अटक किल्ल्यापर्यंत मजल मारली होती. अटक किल्ला जिंकून तेथे साबाजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी भगवा झेंडा फडकवला होता. त्यावरून ‘अटकेपार झेंडे लावणारे मराठे’ ही म्हण रूढ झाली. त्यानंतर दत्ताजी शिंदे व नजीब खान यांच्यात युद्ध झाले होते. नजीब खानाने दत्ताजी शिंदेंना ठार मारले होते. पण त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत दत्ताजी शिंदे नजीबखानाशी झुंज देत होते. नजीब खानाने दत्ताजी शिंदेंच्या मानेवर तलवार ठेवून ‘क्यूं दत्ताजी, और लढोगे क्या ?’ असे विचारले होते. त्यावर दत्ताजी शिंदे यांनी बाणेदारपणे उत्तर दिले होते की, ‘बचेंगे तो और भी लढेंगे’.  दत्ताजी शिंदे यांचे हे उत्तर आजही मराठी व हिंदीत म्हण स्वरूपात वापरले जाते.

दत्ताजी शिंदे यांच्या मृत्यूने त्यावेळी नानासाहेब पेशवे प्रचंड संतापले. त्यानंतर पानिपत युद्ध झाले. पानिपत युद्धाला अनेक कारणांची पार्श्वभूमी आहे. त्यात नजीब खानाने दत्ताजी शिंदेंना ठार मारल्याचेही एक प्रमुख कारण होते. पानिपत युद्धात दत्ताजी शिंदे यांचे दोन्ही भाऊ जनकोजी व महादजी कंबर कसून उतरले होते. पानिपतात मराठ्यांची मोठी हानी झाली. जनकोजी शिंदे मारले गेले. महादजी शिंदे यांचाही पाय अधू झाला, अन् ते कसेबसे वाचले. एवढेच नव्हे तर, या लढाईत शिंदे घराण्यातील 16 जणांनी बलिदान दिले होते. पानिपतामुळे मराठे संपल्यासारखे चित्र तयार झाले होते. पण या मोठ्या पराभवानंतरही मराठे पुन्हा उभे राहिले. त्यात महादजी शिंदे यांचा फार वाटा होता. पानिपतातील धडा घेऊन महादजी शिंदे यांनी त्यांचे मोठे लष्कर उभारले. या लष्कराने ब्रिटिशांनाही सळो की पळो करून सोडले होते. महादजी शिंदेंच्या हयातीत मराठ्यांची सत्ता अबाधित होती. महादजी शिंदेंनी ब्रिटिशांना डोके वर काढू दिले नाही. महादजी शिंदेंच्या मृत्यूनंतर काही काळातच दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा भीमा – कोरेगाव येथे ब्रिटिशांनी पराभव केला, अन् पेशवाई संपुष्टात आली.

मृत्यू दाराशी आला तरी शिंदे घाबरत नाहीत. पराभवानंतरही नव्या उमेदीने पुन्हा उभे राहतात. देशावरील संकट आपले संकट समजून लढतात, असा पूर्वइतिहास ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ‘रक्ता’च्या वक्तव्याने जागृत झाला आहे.

टीम लय भारी

कोरोना कोपला : विधानभवनात शुकशुकाट

राज्य सरकारच्या ‘अभ्यासू’ अधिकाऱ्याला मुंबई विद्यापीठात सन्मानाचे स्थान

तुषार खरात

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

5 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

7 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

8 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

1 day ago