राजकीय

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल, नवाब मलिकांचे धक्कादायक वक्तव्य

टीम लय भारी
नांदेड:- महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी चालुच आहे. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत असतात. त्यातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक  यांनी भाजप नेते किरीट सोमय्या  यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. किरीट सोमय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील आयटम गर्ल असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.( Kirit Somaiya is BJP’s item girl,shocking statement of Malik)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली. नवाब मलिक यांनी म्हटले की, एखाद्या चित्रपट चांगला चालावा यासाठी चित्रपटात आयटम गर्लची आवश्यकता असते.

हे सुद्धा वाचा

संतोष परब हल्ला प्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणेची सुप्रीम कोर्टात धाव

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Nawab Malik on Uddhav Thackeray’s ‘Wasted 25 years with BJP’ remark: ‘Not right to have hatred towards other religions’

किरिट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपच्या आयटम गर्लप्रमाणे आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी राजकारणातील आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

याआधी सोमय्या म्हणाले होते की, नवाब मलिक यांना मला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. कारण त्यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होत की, बीड जिल्ह्यातील देवस्थानची जमीन कुणाला दिली याची चौकशी सरकार करणार आहे. खरंतर ही जमीन धनंजय मुंडे यांनीच खाली आहे. पण मी आता रायगडच्या कर्जमधील देवस्थानच्या जमिनीचा सातबारा माझ्याकडे आला आहे. या व्यक्तीकडे ही देवस्थानची जमीन गेलीच कशी, असा सवाल विचारत संबंधित व्यक्तीची चौकशी व्हायला पाहिजे असं सोमय्या म्हणाले होते.

नांदेड येथे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांना अँटमगर्ल संबोधल्यामुळे राज्यात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

19 mins ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

2 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

4 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago