राजकीय

नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा, सोमय्यांचे थेट ठाकरे सरकारलाच आव्हान

टीम लय भारी

रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे(Kirit Somaiya: Take action on Narayan Rane’s bungalow)

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिलं. अनिल परब यांच्या बंगल्याबाबत बोलता नारायण राणेंच्या बंगल्याबाबत का बोलत नाही? असा सवाल मला केला जातो. राज्यात सरकार कुणाचं आहे? कोस्टल झोन अॅथोरीटी पर्यावरण खात्याकडे आहे.

माहिती अधिकार कायद्याची ऐशीतैशी : पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी शुल्क आकारले, पण कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच केली दगडफेक

त्याचे मंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे मग राणेंनी काही चुकीचं केलं असेल तर करा कारवाई. पुरावे असतील तर पुढे जा, असं सांगतानाच तुम्ही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राणेंमध्ये सेटिंग झाली आहे का? असा सवाल सोमय्या यांनी केला. राणेंवर ठाकरे आणि परब यांनी आरोप केले आहेत. त्याबद्दल त्यांनाच विचारा असंही ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली

उद्धव ठाकरे सरकारचा उजवा हात अनिल परब यांचे रिसॉर्ट केव्हा पाडणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडण्याचे निर्देश दिले होते. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे.

मॅडम माझ्याकडे मलिक आणि दाऊदचा फोटो आहे…, नवाब मलिकांनी शेअर केला स्क्रिनशॉट!

https://www.ndtv.com/india-news/scamsters-shall-not-be-spared-bjp-leader-kirit-somaiya-on-maharashtra-ex-home-minister-anil-deshmukh-2615821

त्यावेळी हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकायुक्तांकडे ही सुनावणी आहे. किरीट सोमय्या सांगतात ते खरं आहे असं राज्य सरकारने सांगितलं आहे. अनिल परब यांनी खोट्या पद्धतीने एनए केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची भेट झाली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनमध्ये रिसॉर्ट बांधला

अकृषी परवाना गैरकायदेशीर रित्या करण्यात आला होता. प्रत्यक्ष 1700 स्केअर मीटर बांधकाम करण्यात आलंय. अनिल परब खोटारडे आहेत. चिटर आहेत. त्यांनी सरकारची फसवणुक केली आहे. सदानंद कदम यांना शेती जमीन म्हणून विकलीय.

पर्यावरण मंत्रालयाने सेटेलाईट मॅपमध्ये बांधकाम मे 2017 नंतर सुरु झाल्याचं सांगितलं आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 20 मार्च 2020 रोजी घेतले होते. परब यांनी महावितरणकडून आपला रिसॉर्ट बांधकाम पूर्ण करण्यासाठी थ्री फेज कनेक्शन घेतले होते. संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असताना परब यांनी रिसॉर्ट बांधायला घेतला होता, असंही त्यांनी सांगितलं.

आदित्य यांनी मेट्रोची वाट लावली

यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रोची वाट लावली. पर्यावरण मंत्रालयाने पाच महिने आदेश देवून बेकायदेशीर रिसॉर्ट का पाडलं जात नाही? असा सवाल त्यांनी केला. सदानंद कदम यांच्या अकाऊंटमधून 5 कोटी रुपये रिसॉर्टसाठी खर्च केले आहेत असं सीएच पत्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago